7th Pay Commission DA : महागाई पावली हो, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी

7th Pay Commission DA : महागाईमुळे चाकरमाने, सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. डाळी, भाजीपाला, किराणा, कर्जाचे हप्ते सगळं सगळं महाग झाले आहे. पण ही महागाई केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.

7th Pay Commission DA : महागाई पावली हो, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 1:40 PM

नवी दिल्ली : महागाईने भलेभले मेटाकुटीला आले आहेत. गरीबांसह मध्यमवर्ग तर हैराण झाला आहे. डाळी, भाजीपाला, किराणा, कर्जाचे हप्ते सगळं सगळं महाग झाले आहे. पण ही महागाई केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे. तुम्ही म्हणाल असं कसं होऊ शकतं. त्यांना केंद्र सरकार अर्ध्या किंमतीत वस्तू, चाजी देणार आहेत की काय? तर तसं नाही. महागाईमुळे त्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने महागाई आटोक्यात आल्याचा डंका वाजवला असला तरी ग्राऊंड रिअलिट तर सर्वसामान्यांनाच माहिती आहे. ग्राहक निर्देशांकावर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे गणित ठरते. तर यंदा महागाई दर जास्त असल्याने कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) , महागाई भत्ता (Dearness allowance) अधिक मिळण्याची शक्यता आहे.

महागाई भत्त्याचे गिफ्ट जुलै महिन्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या जीवनात साखरपेरणी केली आहे. कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मध्ये 46 टक्के महागाई भत्ता (DA) मिळेल. यापूर्वी तो 42 टक्के असेल असा अंदाज लावण्यात येत होता. पण हा अंदाज साफ चुकला.

ग्राहक निर्देशांक वाढला केंद्र सरकार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. महागाईत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे. AICPI इंडेक्समध्ये 0.50 अंकांची तेजी आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मधील महागाई भत्त्यात 4% अतिरिक्त फायदा होईल. महागाई भत्ता 46 टक्के होईल, असा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

महिन्याच्या शेवटी निर्देशांक जाहीर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ग्राहक किंमत निर्देशांकावर निर्धारीत होतो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी तो जाहीर करण्यात येतो. त्याआधारे महागाई भत्त्याचे गणित मांडण्यात येते. CPI(IW)BY2001=100 मार्चच्या 134.2 अंकांच्या तुलनेत मे महिन्यातील आकडा 134.7 अंक राहीला. यामध्ये 0.50 अंकांची भर पडली.

दोनदा होते वाढ  वर्षांतून दोन वेळा डीएमध्ये वाढ होते. 7th pay commission त्यासाठी शिफारस करतो. पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांची वाढ झाली आहे. महागाई दरानुसार केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करते. दुसऱ्या सहामहीसाठी डीएमध्ये वाढीचा प्रस्ताव सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान येऊन केंद्र सरकार त्यावर शिक्कामोर्तब करते. पण यावेळी ऑगस्ट महिन्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

DA स्कोअर इतका वाढला

  • 7th pay commission अंतर्गत कामगार विभागाने 5 महिन्यांची आकडेवारी जाहीर केली
  • जानेवारीत AICPI इंडेक्समध्ये तेजी होती
  • फेब्रुवारीत AICPI इंडेक्स घसरला
  • मार्च महिन्यात निर्देशांक 134.02 वर पोहचला
  • मे महिन्यात निर्देशांक 134.7 अंकावर आला

असा राहिला डीए स्कोअर

  • जानेवारीत DA 43.08 टक्के
  • फेब्रुवारीत महागाई भत्ता 43.79 टक्के
  • मार्च महागाई भत्ता 44.46 टक्के
  • एप्रिल डीए 45.06 टक्के
  • मे DA Score 45.58 टक्के

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.