Gold Silver Price Update : गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी! सोन्याची घसरगुंडी, सर्वोच्च भावापेक्षा एक तोळा इतके स्वस्त

Gold Silver Price Update : सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. खरेदीदारांना मोठी संधी मिळाली आहे. गेल्या महिन्यातील सोन्याच्या उच्चांकी भावापेक्षा यंदा किंमतीत घसरण झाली आहे. त्याचा गुंतवणूकदारांनी फायदा घेता येईल.

Gold Silver Price Update : गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी! सोन्याची घसरगुंडी, सर्वोच्च भावापेक्षा एक तोळा इतके स्वस्त
Follow us
| Updated on: Mar 10, 2023 | 10:05 AM

नवी दिल्ली : सोने आणि चांदी खरेदीदारांसाठी (Gold Silver Price) चांगली बातमी आहे. या व्यापारी आठवड्यातील चौथ्या दिवशी गुरुवारी सोने 41 रुपयांनी महागले तर चांदीचा भाव 90 रुपयांनी वाढला होता. शुक्रवारी सकाळी शुद्धतेच्या आधारावर सोने-चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 51,050 रुपयांहून 51,550 रुपये तोळा तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 55,680 रुपयांहून 56,210 रुपये इतका आहे. सोन्यात गेल्या आठवड्यात चढउतार दिसून आला. सोन्याचे भाव कमी जास्त होत असले तरी ऑलटाईम हाय भावापेक्षा या किंमती कमी आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना खरेदीची पर्वणी साधता येईल. गेल्या काही महिन्यात सोने 50,000 रुपयांवरुन 59,000 रुपयांच्या आसपास पोहचले होते. तर चांदीनेही (Silver Price) लांब उडी मारली होती. पण सोन्याने एका महिन्यात रिव्हर्स गिअर टाकला आणि हा भाव घसरला. सध्या खरेदीदारांसाठी सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे तर स्वस्त चांदीमुळे पण अनेकांची चांदी होत आहे.

गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव काल 51,150 रुपये होता. आज हा भाव 51,550 रुपये तोळा आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत वाढलेली आहे. आज हा भाव 56,210 रुपये आहे. यामध्ये तोळ्यामागे 530 रुपयांची वाढ झाली आहे. पण 2 फेब्रुवारीच्या किंमतीपेक्षा स्वस्तात सोने-चांदी खरेदी करता येणार आहे. काल चांदीच्या किंमतीत किलोमागे 100 रुपयांची घसरण झाली होती. हा भाव 65,450 रुपये प्रति किलो आहे.

गेल्या पंधरवाड्यात 28 फेब्रुवारी रोजी शुद्ध सोन्याचा भाव 56,270 रुपये होता. तर 22 कॅरेटचा भाव 51600 रुपये होता. आजच्या भावाशी तुलना केली असता, आज 22 कॅरेटच्या भावात 50 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्यात 60 रुपयांची तफावत दिसून येते. पण 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोने 58,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्यामानाने सध्या सोने अजूनही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

  1. गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,400 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,070 रुपये आहे.
  2. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,400 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,070 रुपये आहे.
  3. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,400 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,070 रुपये आहे.
  4. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,430 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,100 रुपये आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.