PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता एकाच ATM मधून 3 खात्यांचे पैसे काढता येणार

PNB ने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम सेवा आणलीय. या सेवेअंतर्गत तुम्ही एका एटीएममधून तीन खात्यांमधील पैसे काढू शकाल.

PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; आता एकाच ATM मधून 3 खात्यांचे पैसे काढता येणार
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 10:25 AM

नवी दिल्लीः तुमचे PNB मध्ये म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेत खाते आहे का? जर असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषत: त्या ग्राहकांसाठी ज्यांच्या घरात PNB मध्ये एकापेक्षा जास्त खाती आहेत. PNB ने आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम सेवा आणलीय. या सेवेअंतर्गत तुम्ही एका एटीएममधून तीन खात्यांमधील पैसे काढू शकाल.

तीन बँक खाती एका डेबिट कार्डाशी जोडण्याची सुविधा

देशातील सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना एका खात्यावर एक एटीएम डेबिट कार्ड (एटीएम / डेबिट कार्ड) देतात. एटीएम डेबिट कार्डद्वारे ग्राहक त्यांच्या एकाच खात्यातून पैसे काढतात किंवा व्यवहार करतात. त्यांचे एटीएम त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले आहे. पण पंजाब नॅशनल बँक (PNB) आता तीन बँक खाती एका डेबिट कार्डाशी जोडण्याची सुविधा पुरवत आहे. अशा स्थितीत ग्राहक एकाच एटीएम कार्डमधून 3 बँक खात्यांमध्ये जमा केलेले पैसे काढू शकतील.

ही सुविधा काय आहे?

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा आणली आहे. पीएनबी आपल्या ग्राहकांना ‘अॅड ऑन कार्ड’ आणि ‘अॅड ऑन अकाउंट’ नावाच्या दोन सुविधा देत आहे. अॅड ऑन कार्ड सुविधेअंतर्गत एका बँक खात्यावर तीन डेबिट कार्ड उपलब्ध आहेत. अॅड ऑन अकाउंट सुविधेअंतर्गत तीन खाती एका डेबिट कार्डाशी जोडली जाऊ शकतात. पीएनबी ग्राहकांना 2 किंवा 3 बँक खात्यांसाठी 2 किंवा 3 एटीएम असणे आवश्यक नाही. त्यांना एका कार्डातून तीन बँक खात्यातील रक्कम काढण्याचा लाभ मिळेल. एकंदरीत एका कार्डचे अनेक फायदे आहेत.

1. ‘अॅड ऑन कार्ड’ फॅसिलिटी (Add on Card Facility)

पीएनबीकडून सांगण्यात आले आहे की, ‘अॅड ऑन कार्ड सुविधा’ अंतर्गत ग्राहक त्याच्या बँक खात्यावर त्याला जारी केलेल्या डेबिट कार्ड व्यतिरिक्त 2 अॅड ऑन कार्ड घेऊ शकतात. म्हणजेच एका खात्यावर 3 एटीएम कार्ड चालणार आहेत. परंतु लक्षात ठेवा की फक्त खातेदारांचे पालक, जोडीदार किंवा मुले यात समाविष्ट होतील. या कार्डांच्या मदतीने मुख्य खात्यातून पैसे काढता येतात.

2. ‘अॅड ऑन अकाउंट’ डेबिट कार्ड(Add on Account Facility)

पीएनबीच्या मते, याअंतर्गत तीन बँक खाती एका डेबिट कार्डाशी जोडण्याची सुविधा दिली जात आहे. या सुविधेअंतर्गत कार्ड जारी करताना एका एटीएम कार्डवर तीन बँक खाती जोडली जाऊ शकतात. यापैकी एक मुख्य खाते असेल, तर आणखी दोन खाती असतील. या तीनपैकी कोणत्याही खात्यातून डेबिट कार्डद्वारे व्यवहार करता येतात.

सोयीसाठी ‘या’ 2 अटी महत्त्वाच्या

तुम्हाला या दोन वैशिष्ट्यांबद्दल माहिती असेल. आता आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देखील देणार आहोत. या सुविधा फक्त PNB ATM मध्ये उपलब्ध असतील. 1. या अंतर्गत जर तुम्ही इतर कोणत्याही बँकेचे एटीएम वापरता, तर तेथे तुम्हाला कार्डाद्वारे व्यवहार केल्यानंतरच मुख्य खात्यातून वजा केलेली रक्कम मिळेल. 2. या सुविधेअंतर्गत बँक खाती पीएनबीच्या कोणत्याही सीबीएस शाखेशी संलग्न असू शकतात, परंतु खाती फक्त एका व्यक्तीच्या नावावर असली पाहिजेत. तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

संबंधित बातम्या

PMKVY Scheme: आतापर्यंत 1.37 कोटी तरुणांची नोंदणी, 37 विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण उपलब्ध

Bank Holidays in August 2021 : ऑगस्टमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, अर्धा महिना बँका बंद, पटापट तपासा बँक सुट्ट्यांची यादी

Good news for PNB customers; It is now possible to withdraw money from 3 accounts from a single ATM

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.