SBI च्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी खुशखबर
मुंबई : देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या क्रेडिट कार्डच्या ग्राहकांसाठी 7 विशेष सुविधा देत आहे. यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड योनो अॅपसोबत लिंक करावे लागणार आहे. YONOSBI सोबत लिंक करणाऱ्या ग्राहकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाने योनो अॅप आणि एसबीआय योनो वेबसाईटच्या माध्यमातून कार्डलेस कॅश […]
मुंबई : देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या क्रेडिट कार्डच्या ग्राहकांसाठी 7 विशेष सुविधा देत आहे. यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड योनो अॅपसोबत लिंक करावे लागणार आहे. YONOSBI सोबत लिंक करणाऱ्या ग्राहकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. नुकतेच स्टेट बँक ऑफ इंडियाने योनो अॅप आणि एसबीआय योनो वेबसाईटच्या माध्यमातून कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरु केली होती. ही सुविधा सध्या देशातील 16 हजार 500 एटीएममध्ये सुरु आहे.
क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणार 7 सुविधा
एसबीआयने केलेल्या ट्वीटनुसार, योनोसोबत क्रेडिट कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना सात प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. यामध्ये बिल पेमेन्ट, पिन मॅनेज, कार्ड ब्लॉक, रिवॉर्ड पॉइंट्सला चेक आणि रीडिम करणे इतर सुविधांचा समावेश असणार आहे.
कशी करायची लिंक?
सर्वात पहिले तुमच्या मोबाईल फोनमध्ये एसबीआयचा अॅप डाऊनलोड करा. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग ईन करा. अॅप सुरु झाल्यानंतर तुम्ही ‘गो टू कार्ड’ यावर जावा आणि तेथे ‘माय क्रेडिट कार्ड’वर क्लिक करा. यानंतर आपल्या एसबीआय क्रेडिट कार्डची माहिती भरा. क्रेडिट कार्ड लिंक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून YONOSBI च्या सुविधांचा फायदा घेऊ शकता.
योनो कॅश सुविधा
एसबीआयने डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्यासाठी योनो कॅश लाँच केले होते. या योनो कॅशच्या माध्यमातून आता ग्राहक एसबीआयच्या 1.65 लाख एटीएममधून डेबिट कार्डशिवाय पैसे काढू शकतो. देशात सर्वात पहिली डेबिट कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरु केली.
योनो कॅश सुरक्षीत आहे?
- योनो कॅशला सुरक्षीत बनवले आहे.
- योनो कॅशला सुरक्षीत करण्यासाठी दोन फॅक्टरने तपासण्यात आले होते.
- योनो कॅशमुळे क्लोनिंग आणि स्किमिंग होणे अशक्य आहे.
- योनो कॅशमुळे कार्ड संबधित सर्व फसवणूक कमी होऊ शकते.
- ही सेवा देणाऱ्या एटीएमचे नाव योनो कॅश पॉइंट आहे.