Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! भावात मोठी कपात, यादिवशी आनंदवार्ता धडकणार

Petrol-Diesel Price : देशात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. परंतु, भाव मात्र कमी झालेला नाही. काही दिवसांतच केंद्र सरकार ही नाराजी दूर करण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या फरकाने कमी होण्याची शक्यता आहे.

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! भावात मोठी कपात, यादिवशी आनंदवार्ता धडकणार
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 7:21 PM

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदवार्ता आहे. लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त (Petrol-Diesel Cheaper) होण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल गेल्या वर्षभरापासून आम्ही हेच ऐकतोय, पण इंधन कधी स्वस्त होणार याची तारीख कोणीच सागंत नाही. तर इंधन स्वस्ताईसंबंधीच्या सर्व घडामोडी काय सुरु आहे. इंधन आताच स्वस्त होण्यामागेच गणित आपण समजून घेऊयात. देशात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. परंतु, भाव मात्र कमी झालेला नाही. काही दिवसांतच केंद्र सरकार (Central Government) ही नाराजी दूर करण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती मोठ्या फरकाने कमी होण्याची शक्यता आहे.

कच्चा तेलाचा रोल कच्चा तेलापासूनच रिफाईन करुन पेट्रोल, डिझेलची निर्मिती होते. गेल्या वर्षी क्रूड ऑईलचा भडका उडाला होता. भाव जवळपास 140 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. त्यानंतर ओपेक देशांनी भाव आटोक्यात आणले. या वर्षाच्या सुरुवातीपासून तर भाव कमालीचे घसरले. इतकी मोठी पडझड गेल्या 15 वर्षांत पहिल्यादांच दिसून आली. कच्चे तेल सध्या 73 ते 78 डॉलर प्रति बॅरल या दरम्यान खेळत आहे. त्यामुळे देशात पेट्रोल 120 रुपयांच्या घरात पोहचले होते.

स्वस्ताईला लागला ब्रेक भारत रशियाकडून स्वस्तात कच्चा तेल खरेदी करत आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत काहीच बदल झाला नाही. मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईलच्या किंमती सर्वाधिक प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. एक लिटर पेट्रोलमागे कंपन्यांना विक्रमी 17.4 रुपये आणि डिझेलमागे 27.7 रुपयांचा तोटा झाला. तेव्हा जनतेचा रोष नको म्हणून पेट्रोल-डिझेलचा भाव वाढविण्यात आला नाही. त्यावेळच्या तोट्याची भरपाई कंपन्या करुन घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

उत्पादन शुल्कात कपात केंद्र सरकारने 22 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) कपात केली. त्यानंतर देशातील भाजपशासित राज्यांनी तोच कित्ता गिरवला. त्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली. त्यामुळे जनतेला एका लिटरमागे 10 ते 12 रुपयांचा फायदा तर झालाच. पण गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही.

किती होईल कपात पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलमध्ये एक ते दोन रुपयांची नाही तर 20 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा मार झेलणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कधी होणार कपात सूत्रांच्या माहितीनुसार. पेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच कमी होतील. पुढील 6 महिन्यात हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतील. तज्ज्ञांच्या मते, सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 20 रुपयांची कपात होण्याची संभावना आहे. ही कपात एकदाच होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने ही कपात करण्यात येईल.

जून महिन्यात पहिली कपात मे महिन्यात कर्नाटक राज्यातील निवडणूक आहे. त्यानंतर 4 राज्यातील निवडणूका होतील. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणूका होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे. याच कालावधीत इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.