Petrol-Diesel Price News | खूशखबर, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, इतक्या रुपयांनी उतरणार भाव

Petrol-Diesel Price Update | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरण्याचे संकेत मिळाल्याने देशातही पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. मग इंधन कितीने स्वस्त होणार, ते पाहुयात..

Petrol-Diesel Price News | खूशखबर, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, इतक्या रुपयांनी उतरणार भाव
पेट्रोल डिझेल होणार स्वस्तImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 9:49 AM

Petrol-Diesel Price | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या(Crude Oil) किंमती झपाट्याने खाली उतरल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर गेल्या 7 महिन्यातील निचांकी स्तरावर (Lowest Level) पोहोचले आहेत. आज ब्रेंट क्रूड ऑइल 92 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यापार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव घसरले असले तरी देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मात्र स्थिर आहेत. आता या नवीन घडामोडींमुळे देशातही पेट्रोल-डिझेल स्वस्त (Petrol-Diesel Price ) होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उत्पादन शुल्क घटवले

आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. 21 मे रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे देशभरात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटर स्वस्त झाले होते.

पेट्रोल, डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार

या बदलत्या परिस्थितीचा सर्वसामान्यांना फायदा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 ते 3 रुपयांची घसरण होईल. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कच्चे तेल 90 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास होते, जूनमध्ये त्याची किंमत 125 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. ब्रेंट कच्चे तेल सध्या प्रति बॅरल 92.84 डॉलरवर व्यापार करत आहे.

हे सुद्धा वाचा

तुमच्या शहरात काय आहे प्रति लिटर भाव

शहर                            पेट्रोल                      डिझेल

अहमदनगर                 106.44                  92.44

अकोला                      106.14                   92.69

औरंगाबाद                  107.14                   95.94

जळगाव                     107.81                    93.73

मुंबई                           106.31                   94.27

कोल्हापूर                    106.55                   93.08

नांदेड                         108.32                    94.78

नागपूर                       106.06                    92.61

पुणे                            105.96                     92.48

परभणी                     109.47                      95.86

किंमत दररोज संध्याकाळी 6 वाजता बदलतात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. या नव्या किंमती सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर वस्तू जोडल्यानंतर किंमत जवळजवळ दुप्पट होते.

तुमच्या शहरातील इंधन दर जाणून घ्यायचे आहेत ?

आपण एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP टाईप करुन 9224992249 या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतो.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.