कोरोना काळात बँक झाल्या मालामाल; एसबीआयपासून सगळ्याच बँकांची बक्कळ कमाई

चालू आर्थिक वर्ष 2021 मध्ये बँकिंग क्षेत्राला विक्रमी 1,02,252 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्याआधी म्हणजेच सन 2019 च्या आर्थिक वर्षात भारती बँकिंग उद्योगाला जवळपास 5000 कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. (Goods bank during the Corona period; All banks have huge earnings from SBI)

कोरोना काळात बँक झाल्या मालामाल; एसबीआयपासून सगळ्याच बँकांची बक्कळ कमाई
SBI Bank
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 5:40 PM

नवी दिल्ली : कोरोनामुळे सामान्य जनतेपासून ते सरकारपर्यंत सगळ्यांनाच त्रास झाला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेगही मंदावला आहे. देशाचा विकास दर अर्थात जीडीपी 40 वर्षात पहिल्यांदाच -7.3 टक्क्यांवर खाली आला आहे. परंतु या काळात देशाच्या बँकिंग क्षेत्राला चांगले दिवस राहिले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपासून खाजगी बँकांपर्यंत सर्व बँकांना मोठा नफा झाला आहे. चालू आर्थिक वर्ष 2021 मध्ये बँकिंग क्षेत्राला विक्रमी 1,02,252 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्याआधी म्हणजेच सन 2019 च्या आर्थिक वर्षात भारती बँकिंग उद्योगाला जवळपास 5000 कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. (Goods bank during the Corona period; All banks have huge earnings from SBI)

नफ्याविषयी बोलायचे झाल्यास देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला 31,116 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, जो संपूर्ण बँकिंग क्षेत्राच्या तुलनेत 30 टक्के इतका आहे. दुसरकीकडे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनेही या काळात बरीच कमाई केली आहे.

खाजगी बँकांची मिळकत का वाढली?

कोरोना कालावधीत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला 20,410 कोटी रुपये इतका नफा झाला आहे. बँकिंग क्षेत्रातील एकूण नफ्याच्या तुलनेत हे प्रमाण 20 टक्के इतके आहे. दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेला 16,192 कोटी रुपये इतका नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या नफ्याचे प्रमाण दुप्पट आहे. खाजगी बँकांच्या नफ्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्जाची गती मंदावलेलीच राहिली. कोरोना काळात लोकांना अधिक कर्जाची गरज भासली. अशा परिस्थितीत सरकारी बँकांनी कर्ज देण्यासाठी आखडता हात घेतल्यामुळे त्याचा खासगी बँकांना मोठा फायदा मिळाला. सरकारी बँकांच्या तुलनेत खासगी बँकांनी कर्जाची गती वाढविली. कोरोना कालावधीत खासगी बँका कर्ज देण्याच्या बाबतीत सरकारी बँकांपेक्षा अधिक सक्रिय राहिल्या.

सार्वजनिक क्षेत्रातील 12 पैकी केवळ 2 बँकांचे नुकसान

बँकिंग क्षेत्राच्या एकूण नफ्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा वाटादेखील मजबूत आहे. या काळात देशातील सार्वजनिक क्षेत्रातील 12 पैकी फक्त 2 बँकांचे नुकसान झाले आहे. खास गोष्ट म्हणजे या सरकारी बँका पहिल्यांदाच कलेक्टिव नेट प्रॉफिटमध्ये आल्या. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बँकांच्या नुकसानीचे प्रमाण कमीच आहे.

बॅड लोन हेदेखील एक मोठे कारण

बँकांच्या नफ्यातील एक प्रमुख कारण असे आहे की या काळात बर्‍याच मोठ्या बँका बॅड लोनच्या समस्येतून बाहेर आल्या आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने 80 टक्के नफा मिळविला आहे. त्याचबरोबर देशातील दोन मोठ्या खासगी बँकांच्या नफ्याची वाढदेखील नेत्रदीपक ठरली आहे. दुसरीकडे सरकार सध्या विलीनीकरणाद्वारे बँकांची स्थिती मजबूत करण्याबाबत सातत्याने काम करीत आहे. (Goods bank during the Corona period; All banks have huge earnings from SBI)

इतर बातम्या

Video: ब्रेकिंग न्यूज सांगताना पत्रकार थांबला, लाईव्ह टीव्हीवर म्हणाला ‘पगार मिळत नाहीये, आम्हीही माणसंच’

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.