Google Employees Salary : एक तास करा काम, वर्षाला कमवा कोटी! कोणाला नकोय अशी नोकरी

Google Employees Salary : काही गुगल कर्मचाऱ्यांना जोरदार लॉटरी लागली आहे. तंत्रज्ञानाचे विशेष कौशल्य असणारे कर्मचारी दिवसभरात अवघे एक तास काम करतात आणि त्यांना वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे वेतन मिळते.

Google Employees Salary : एक तास करा काम, वर्षाला कमवा कोटी! कोणाला नकोय अशी नोकरी
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 7:11 PM

नवी दिल्ली | 24 ऑगस्ट 2023 : दिवसभरात केवळ एक तास कार्यालयीन काम करायचे आणि त्या मोबदल्यात वर्षाला एक कोटींहून अधिकचा पगार कमावायचा. हो, अगदी खरं आहे. विश्वास बसत नसेल, पण काही कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट खरी करुन दाखवली आहे. गुगल ही कर्मचाऱ्यांसाठी सर्वात चांगली कंपनी म्हणून ओळखल्या जाते. गुगलमध्ये (Google Employees) करिअर करण्याचे, नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. गुगलमधील एका कर्मचाऱ्याने सर्वांनाच तोंडात बोटं घालावायला लावली आहे. या कर्मचाऱ्याने दिवसाला केवळ एक तासच काम केले आणि वार्षिक 1 लाख 50 हजार डॉलर म्हणजे 1.2 कोटी रुपये (Yearly Package) कमावले आहे. याशिवाय त्याच्या या एक तासातील कामावर फिदा होत, कंपनीने त्याला बोनसची बक्षिसी पण दिली आहे.

काय करतो काम

गुगलच्या या कर्मचाऱ्याचे काम गुगल आणि त्याच्या उत्पादनांसाठी टूल लिहिण्याचे आहे. फॉर्च्युनच्या एका अहवालानुसार, या गुगल कर्मचाऱ्याने त्याची ओळख लपवली आहे. त्याने त्याचे काल्पनिक नाव डेवोन ठेवले आहे. हा कर्मचारी रोज सकाळी 9 वाजता उठतो. त्यानंतर स्वतःसाठी नाष्टा तयार करतो. त्यानंतर कार्यालयात जाण्यासाठी तयार होतो. तो 11 वाजेपर्यंत काम करतो. त्यानंतर त्याच्या स्टार्टअपवर रोज रात्री 9 वाजता अथवा 11 वाजेपर्यंत काम करतो.

हे सुद्धा वाचा

तर जास्त तास काम

या कर्मचाऱ्यानुसार, दीर्घ कालावधीसाठी काम करायचे असेल तर कर्मचाऱ्यांना स्टार्टअपमध्ये काम करण्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात कुशलता मिळविण्यासाठी, प्राविण्य मिळविण्यासाठी दीर्घ कालावधीसाठी काम करणे आवश्यक असते. स्टार्टअप अथवा काही नामी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरला जास्त काळ काम करावे लागू शकते.

कोट्यवधी पॅकेजसह वार्षिक बोनस

डेवोन हा अवघ्या 20 वर्षांचा आहे. त्याला 150,000 अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास 1.2 कोटी रुपयांचा वार्षिक पगार मिळतो. तो प्रत्येक दिवशी एक तासच काम करतो. त्याला चांगले काम केल्यामुळे बोनस पण गुगल देते. गुगल त्याला इतर अनुषांगिक लाभ पण देते.

सर्वाधिक पगार देणारी कंपनी

गुगलने यावर्षी जानेवारी महिन्यात 12 हजार कर्मचाऱ्यांना काढले होते. त्यानंतर Google ची मूळ कंपनी Alphabet 2022 ने सर्वात जास्त वेतन दिले होते. जगातील सर्वाधिक वेतन देणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये गुगलचा समावेश आहे. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, अल्फाबेट 280,000 अमेरिकी डॉलरचे वेतन देते. ही कंपनी सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ही स्टोरी पण व्हायरल

ट्विटरवर एका गुगल कर्मचाऱ्याची स्टोरी जोरदार व्हायरल होत आहे. गुगलमधील एक कर्मचारी दररोज केवळ 2 तास काम करतो. त्यासाठी कंपनी त्याला 500,000 डॉलर (4.1 कोटी रुपये) पगार देते. या व्हायरल ट्विटवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहे. युझर्स ही पोस्ट शेअर करत आहेत.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.