AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget : तुम्हाला कसा हवाय अर्थसंकल्प, काय हवेत बदल, बिनधास्त द्या सल्ला, मांडा सूचना..थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पोहचवा तुमच्या भावना..

Union Budget : तुम्हाला अर्थसंकल्पात काही बदल हवा असल्यास, अपेक्षित बदल हवा असल्यास बिनधास्त द्या सल्ला..

Union Budget : तुम्हाला कसा हवाय अर्थसंकल्प, काय हवेत बदल, बिनधास्त द्या सल्ला, मांडा सूचना..थेट केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पोहचवा तुमच्या भावना..
बिनधास्त मांडा मते Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 29, 2022 | 10:52 PM
Share

नवी दिल्ली : आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाची (Central Budget) जय्यत तयारी सुरु आहे. केंद्रीय अर्थमंत्रालय (Finance Ministry) अर्थसंकल्प तयार करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. देशातील उद्योग आणि प्रमुख संस्थांच्या अध्यक्ष, संचालकांसोबत बजेट पूर्व (Pre Budget) चर्चेच्या अनेक फेऱ्या सुरु आहेत. बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिकांची (Citizen) इच्छा, आशा-आकांक्षा यांना महत्त्व देण्यासाठी, हे बजेट खऱ्या अर्थाने लोकाभिमूख होण्यासाठी केंद्र सरकारने एक अनोखी योजना आणली आहे.

जर तुमच्याकडे ही अर्थसंकल्पाविषयी काही बदल, काही सूचना, सल्ला, चांगल्या कल्पना असतील तर या कल्पना, सूचना, सल्ला तुम्ही केंद्र सरकार, अर्थमंत्रालयापर्यंत पोहचवू शकता. त्यासाठी केंद्र सरकारने प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यासंदर्भातील ट्विट केले. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना बजेटविषयीच्या त्याच्या भावना कशा सरकारपर्यंत पोहचविता येतील, याची माहिती दिली.

तुम्ही तुमच्या कल्पना, सल्ला www.mygov.in या संकेतस्थळावर देऊ शकता. याठिकाणी मुख्य पेजवर तुम्हाला बजेट 2023-24 बाबत तुमच्या कल्पना, सल्ले, सूचना शेअर करण्यासाठी एक लिंक देण्यात येणार आहे .

त्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल. जर तुम्ही पूर्वीपासूनच यावर नोंदणी केली नसेल. तुमचा तपशील देऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला लॅपटॉप, पीसी वा मोबाईलवरुन लॉग इन करता येईल.

तुमच्या सूचना, सल्ला देण्यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक अथवा ई-मेल आयडी द्याव लागेल. त्यावर एक ओटीपी येईल. त्यानंतर तुम्हाला अर्थसंकल्पाविषयीची तुमची मते मांडता येतील. भारतीय नागरिकांना 24 नोव्हेंबर पासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. येत्या 10 डिसेंबरपर्यंत कल्पना शेअर करु शकता.

केंद्र सरकारचा दावा आहे की, सरकार दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी जनतेच्या सूचना, हरकती, सल्ला, कल्पना यांचा स्वीकार करते. त्यातील काही सूचनांचा समावेशही अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्रानुसार, नागरिकांच्या सूचनांमुळे भारताला जागतिक पातळीवर आर्थिक शक्ती म्हणून उभरण्यास मोठा वाव मिळतो. यंदाच्या अर्थसंकल्पात महगाई कमी करण्याचे मोठं आव्हान केद्र सरकारसमोर असेल.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.