Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IDBI Bank News | आयडीबीआय बँकेतील ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

IDBI Bank News | सरकार आयडीबाय बँकेतील हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार 51 टक्के हिस्सा विकणार असल्याची माहिती ब्लूमबर्ग या संकेतस्थळाने दिले आहेत. बँकेच्या खासगीकरणाची चाचपणी पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.

IDBI Bank News | आयडीबीआय बँकेतील ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, केंद्र सरकारने घेतला हा निर्णय
आयडीबीआय बँक खासगीकरणाच्या वाटेवरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 11:45 AM

IDBI Bank News | आयडीबीआय बँकेतील (IDBI Bank) किमान 51 टक्के हिस्सा (Stake) विकण्याचा सरकारचा विचार आहे. सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) अधिकाऱ्यांमध्ये भागविक्री योजनेवर चर्चा सुरु आहे. एलआयसी आणि सरकारची मिळून आयडीबीआय बँकेत एकूण 94 टक्के भागीदारी आहे. हिस्सा विक्रीची चर्चा सुरु असली तरी हे दोन्ही पक्ष बँकेतील काही हिस्सा राखून ठेवण्याच्या विचारत आहेत. हिस्सेदारी विक्रीचा करार तयार करण्यात येत आहे. यावरचा अंतिम निर्णय मंत्र्यांची गठित समिती घेणार असल्याची माहिती सूत्रांच्या आधारे ब्लूमबर्गने (Bloomberg) दिली आहे. विक्री योजनेत खरेदीदार किती उत्सूक आहे याची चाचपणी येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने गेल्या वर्षी मे महिन्यात, निर्गुंतवणूक (Disinvestment) आणि आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापन नियंत्रणाचे हस्तांतरण करण्यास तत्वतः मान्यता दिली होती.

कायद्यात सुधारणा

ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आयडीबीआय बँक कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या बँकेत सरकारचा 45.48 टक्के हिस्सा आहे, तर एलआयसीचा 49.24 टक्के हिस्सा आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, या व्यवहारासंबंधी वित्त मंत्रालय आणि आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तर एलआयसीने याविषयी भाष्य केले नाही.

427.7 अब्ज बाजार भांडवल

आयडीबीआय बँकेचे शेअर्स गेल्या 12 महिन्यांत 6.3 टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे बँकेचे बाजार भांडवल 427.7 अब्ज रुपये झाले. बुधवारी, 24 ऑगस्ट रोजी बीएसईवर(BSE) दिवसभरातील व्यापारात बँकेचा शेअर जवळपास 5 टक्क्यांनी वाढून 41 रुपयांवर पोहोचला. व्यापाराच्या शेवटच्या सत्रात 2.82 टक्क्यांची वाढ झाल्यानंतर हा शेअर 40.10 रुपयांवर बंद झाला.

हे सुद्धा वाचा

सरकारचे व्यवस्थापनावर नियंत्रण

सरकार सध्या आयडीबीआय बँकेतील स्वतःचे आणि एलआयसीचे किमान काही भागभांडवल विक्रीच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक खरेदीदारांना 40 टक्क्यांहून अधिकचा हिस्सा खरेदी करण्याची परवानगी देऊ शकते असे सूत्रांच्या आधारे ब्लूमबर्गने स्पष्ट केले आहे. आरबीआयच्या अखत्यारीत काम करणाऱ्या कंपन्यांना विहित मर्यादेपेक्षा जास्त भागभांडवल खरेदी करण्याची परवानगी घ्यावी लागते. मध्यवर्ती बँकेच्या कक्षेबाहेरील कंपन्या केवळ 10-15 टक्के हिस्सा खरेदी करू शकतात. सरकारने यावर्षी 65,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. यापैकी एक तृतीयांश रक्कम एलआयसीच्या आयपीओमधून उभारण्यात आली आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.