सुकन्या योजनेसह छोट्या बचत ठेवीदारांना मोठा झटका बसणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता
माध्यमांमधील काही वृत्तांनुसार छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूकदारांना केंद्र सरकारकडून झटका बसण्याची शक्यता आहे. interest rates on Sukanya Samridhi
नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गामुळे भारताच्या अर्थव्यव्सथेला मोठा फटका बसलेला आहे. माध्यमांमधील काही वृत्तांनुसार छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूकदारांना केंद्र सरकारकडून झटका बसण्याची शक्यता आहे. सरकार छोट्या बचत योजनांवरील व्याज 1 जुलैपासून कमी करण्याची शक्यता आहे. सरकारने व्याज दर कपातीचा निर्णय घेतल्यास पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजना, सीनियर सिटीजन्स स्कीम, किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट आणि नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (NSC) या योजनांमधील गुंतवणूक दारांना फटका बसण्याची चिन्ह आहेत. सरकारपुढे कोरोना महामारी आटोक्यात आणणे त्यासोबत अर्थव्यवस्थेला सावरण्याचं देखील आव्हान आहे. यामुळे सरकारला आता कर्ज काढावं लागेल अशी परिस्थिती आहे. कर्ज काढणे म्हणजेच बाँड यील्ड वाढू शकतात. (Government will reduce interest rates on Sukanya Samridhi, PPF,NSC from July 1 Know Why)
सामान्य माणसांवर अगोदरच महागाईचं संकट
कोरोना विषाणू महामारीमुळं आलेल्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारपुढे छोट्या बचत खात्यांवरील व्याज दर कमी करण्याचा पर्याय आहे. मात्र, असं केल्यास गुंतवणूकदारांची नाराजी केंद्र सरकारवर वाढू शकते. अगोदरच पेट्रोल, डिझेल आणि रोजच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या समस्या वाढलेल्या आहेत. अशा परिस्थिती व्याज दर कमी करणं सरकारसाठी धोक्याची घंटा ठरु शकतं.
सरकारचा यूटर्न
छोट्या बचत खात्यांवरील व्याज दर करमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं एप्रिल ते जून या तिमाहीसाठी घेतला होता. मात्र, जनतेच्या नाराजीमुळे अवघ्या २४ तासात हा निर्णय सरकारला मागे घेत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना जाहीर करावं लागलं होतं.
सध्या किती व्याज मिळते?
सध्या सर्वाधिक व्याज सुकन्या समृद्धी योजनेवर मिळते. छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर टॅक्समध्ये सूट देखील मिळते.
- सेविंग्ज खाते :3.50%
- 1 वर्षाची ठेव : 4.40%
- 2 वर्षाची ठेव : 5.00%
- 3 वर्षाची ठेव : 5.10%
- 5 वर्षाची ठेव : 5.80%
- 5 वर्षाची रिकरिंग ठेव : 5.30%
- सीनियर सिटीजन्स सेविंग्स स्कीम :6.50%
- मंथली इनकम अकाऊँट: 5.70%
- नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट: 5.90%
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड : 6.40%
- किसान विकास पत्र: 6.20%
- सुकन्या समृद्धी योजना : 6.90%
कोरोना महामारीत हा मुलगा नेटकऱ्यांचं मन जिंकतोय, या चिमुकल्याची सोशल मीडियावर चर्चा, फोटो एकदा पाहाचhttps://t.co/XKUsG2DeIX#SocialMedia | #Corona | #Child | #TrendingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 19, 2021
संबंधित बातम्या:
पीएफचा नवा नियम 1 एप्रिलपासून लागू होणार; नोकरदारांवर परिणाम काय?
Government will reduce interest rates on Sukanya Samridhi, PPF,NSC from July 1 Know Why