भारतातील सर्वात मोठा आयपीओ; केंद्र एलआयसीतील 5 टक्के समभागांची विक्री करणार

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) रविवारी बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) सार्वजनिक करण्यासाठी कागदपत्रे दाखल केली. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.

भारतातील सर्वात मोठा आयपीओ; केंद्र एलआयसीतील 5 टक्के समभागांची विक्री करणार
LIC (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 9:02 AM

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) रविवारी बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) सार्वजनिक करण्यासाठी कागदपत्रे दाखल केली. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. . प्रस्तावित माहितीपत्रकानुसार (Draft Prospectus) आयपीओचे प्रवर्तक म्हणून सरकार 31.6 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे. तसेच विमा कंपनीचे 5 टक्के समभाग रुपांतरीत होतील.. एलआयसी सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी योजनेच्या 35% अथवा सुमारे 11.1 कोटी शेअर्स राखून ठेवण्यात आले आहेत. एलआयसी सर्वसामान्य गुंतवणुकदारांसोबतच आयपीओचा काही भाग त्यांच्या विमाधारकांसाठी  सुद्धा राखून ठेवणार आहे. परंतु विमाधारकांसाठी नेमकी किती संख्या राखून ठेवण्यात येणार आहे याचा खुलाासा माहितीपत्रकात करण्यात आलेला नाही. सर्वसामान्य गुंतवणुकदार आणि विमाधारकांना आयपीओसाठी किती व कशी सवलत देण्यात येईल याचा उल्लेख माहितीपत्रकात देण्यात आलेली नाही.

आयपीओसाठी 31 मार्चपूर्वीचा मुहुर्त

यावर्षी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी एलआयसी आयपीओ साठीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगितले होते. त्यानुसार, या 31 मार्चपूर्वी जगातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक असलेली एलआयसी बाजारात सुचीबद्ध होईल. सेबीकडे प्रस्तावित माहितीपत्रक सादर करताना सरकारी सुत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, प्रति शेअरविषयीच्या किंमतीविषयी मांडलेल्या आकडेमोडीवर नजर टाकली तर, एलआयसी या आयपीओसाठी 15 लाख कोटी रुपयांच्या बाजार मुल्यांकनाचा विचार करत आहे. मुल्यांकनाचा हा आकडा गाठण्यासाठी आयपीओची किंमत 2,370 रुपये प्रति शेअर ठेवावी लागेल. जर 16 लाख कोटींचे मुल्यांकन गृहित धरले तर आयपीओची किंमत 2,530 रुपये प्रति शेअर ठेवावी लागेल आणि मुल्यांकन 13 लाख कोटी रुपये असेल तर प्रति शेअर 2,060 रुपये किंमत असेल. सध्या 16.1 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वाधिक मुल्यांकन असलेली कंपनी आहे, तर टीसीएस 13.7 लाख कोटी रुपयांच्या बाजारमुल्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे बीएसईच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

विमा कंपनीचा 66% बाजारहिस्सा

1956 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एलआयसीच्या शेअर्सच्या अधिग्रहणासाठी सरकारला प्रति शेअर 16 पैसा खर्च येणार असल्याची माहिती सेबीकडे दाखल माहितीपत्रकात देण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय मुल्यांकन करणा-या अॅ मिलियन अॅडव्हायझर्सने केलेल्या गणनेनुसार 30 सप्टेंबर 2021 रोजी जीवन विमा कंपनीचे बाजारमुल्य 5.4 लाख कोटी रुपये होते.

इतर बातम्या:

बाजारभावापेक्षा कमी किंमतीतलं घरं तुमची वाट पाहतंय… ‘पीएनबी’कडून मालमत्तांचा ‘मेगा ई-लिलाव’

एअर इंडिया आणि एअर एशिया देणार एकमेकांच्या प्रवाशांनाही विमानात ‘एंट्री’

‘या’ स्टॉकने केले गुंतवणूकदारांना मालामाल, पाच वर्षांत 1 लाखाचे झाले 82 लाख

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.