निवडणुकीच्या धामधुमीत जनतेचे सरकारला ‘गिफ्ट’; अशी केली कमाई रेकॉडब्रेक 

GST Collection : निवडणुकीच्या हंगामात सरकारला मोठी लॉटरी लागली आहे. जनतेने सरकारची तिजोरी भरली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी जीएसटी वसुलीची आकडेवारी समोर आणली. त्यानुसार यंदा 2 लाख कोटींचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. गेल्यावर्षीपेक्षा 12 टक्क्यांपेक्षा अधिक जीएसटी वसूली झाली आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत जनतेचे सरकारला 'गिफ्ट'; अशी केली कमाई रेकॉडब्रेक 
सरकार मालामाल आता जनतेला दिलासा केव्हा?
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 3:35 PM

देशात निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. त्यातच आता सरकारसाठी आनंदवार्ता आली आहे. जनतेने निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारचा खजिना भरणार आहे. आकडेवारीनुसार, पहिल्यांदा सरकारला रेकॉडब्रेक कमाई करता आली. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी याविषयीची आकडेवारी समोर आणली. त्यानुसार गेल्या 7 वर्षांत पहिल्यांदा जीएसटी वसुलीचा आकडा 2.1 लाख कोटींच्या घरात गेला. जो गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातील वसुलीपेक्षा 12.4 टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात सरकारला 1.87 लाख कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली होती.

निव्वळ जीएसटी किती

  • केंद्रीय अर्थमंत्रालयाने 1 मे रोजी अधिसूचनेद्वारे ही आकडेमोड समोर आणली. रिफंड दिल्यानंतर एप्रिल महिन्यात निव्वळ जीएसटी वसुली 1.92 लाख कोटी रुपये आहे. ही गेल्यावर्षीपेक्षा 17.1 टक्के अधिक आहे. वर्ष 2017 मध्ये देशभरात जीएसटी कायदा लागू झाला होता. प्रत्येक वर्षी हा आकडा वाढतच आहे.
  • 2017-18 मध्ये सरकारला जीएसटी वसुलीतून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई झाली होती. कोरोना काळानंतर हा आकडा सातत्याने वाढत आहे. 2020-21 पासून हा आकडा खाली आलेला नाही. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जीएसटी वसुली सरासरी 1.51 लाख कोटी रुपये प्रति महिना झाली आहे.

महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा

हे सुद्धा वाचा

चालू आर्थिक वर्षात 2024-25 च्या पहिल्या महिन्यात जीएसटी वसुली 2 लाख कोटींपेक्षा अधिक झाली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात 1.78 लाख कोटी जीएसटी वसुली झाली होती. त्यापेक्षा हा आकडा 17.81 टक्के अधिक आहे. सालाबादाप्रमाणए जीएसटीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. एप्रिल महिन्यात जीएसटीचे 37,671 कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा 13 टक्के अधिक आहे.

कशी झाली कमाई

एकूण जीएसटी वसुलीत यंदा केंद्रीय जीएसटी कलेक्शन 43,846 कोटी रुपये, तर राज्याकडून 53,538 कोटी रुपयांची वसुली झाली. एकीकृत जीएसटी 99,623 कोटी रुपये राहिला. यामध्ये 37,826 कोटी रुपये आयात केलेल्या वस्तूंवर मिळाले. याशिवाय जीएसटी सेसच्या रुपात 13,260 कोटी रुपयांची वसुली झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करत जीएसटी वसुलीत पहिल्यांदाच 2 लाख कोटींचा टप्पा ओलांडल्याची माहिती देण्यात आली आहे.

राज्यांच्या झोळीत काय

एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने एकीकृत जीएसटीमधून 50,307 कोटी रुपयांचे सेटलमेंट केले. तर राज्यांना 41,600 कोटी रुपये दिले. राज्यांची एकूण जीएसटी वसुली 95,138 कोटी रुपयांवर पोहचली आहे. तर केंद्राची एकूण 94,153 कोटी रुपये जीएसटी वसुली झाली आहे. जीएसटीच्या बिलावर नजर फिरवल्यास तुम्हाला त्यात राज्य आणि केंद्राचे दोन वाटे दिसतील.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.