Tax On Gutkha : पिचकारी मारणाऱ्यांवर मोठं संकट! या दिवशी केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय 

Tax On Gutkha : गुटखा खाणाऱ्यांना आता आणखी पैसा मोजावा लागू शकतो, केंद्र सरकार काय घेऊ शकते भूमिका, या दिवशी याविषयीचा निर्णय होऊ शकतो. 

Tax On Gutkha : पिचकारी मारणाऱ्यांवर मोठं संकट! या दिवशी केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय 
पिचकारी पडणार महागात
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 4:39 PM

नवी दिल्ली  : नुकताच अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी ‘हर फिक्र को धुएं मे’ उडाविणाऱ्यांना चांगलाच दणका दिला. सिगारेटच्या किंमती वाढणार असल्याने धुम्रपान करणाऱ्यांना चिंता सतावत आहे. आता दुसरा क्रमांक जागोजागी लाल पिचकाऱ्या मारणाऱ्यांचा आहे. केंद्र सरकार गुटखा खाणाऱ्यांना जोरदार फटका देण्याच्या तयारीत आहे. गुटखा खाणाऱ्यांना महागाईचा फटका बसू शकतो. या महिन्यात 18 फेब्रुवारी रोजी वस्तू आणि सेवा कराची परिषदेची (GST Council) बैठक होत आहे. या बैठकीत गुटखा आणि पान मसाल्यावर (Gutkha And Pan Masala) कर लावण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गेल्याच बैठकीत गुटखा कंपन्यांवर कर लावण्याचा प्रस्ताव मंत्री समूहाकडे विचारस्तव पाठविण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला  सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेत राज्य अर्थमंत्रीही उपस्थित राहतील. जीएसटी परिषदेने शुक्रवारी ट्विट केले. त्यानुसार, जीएसटी परिषदेची 49वीं बैठक नवी दिल्लीत 18 फेब्रुवारी, 2023 रोजी होईल.

या परिषदेत मंत्र्यांचा गट पान मसाला आणि गुटखा कंपन्यांवर कर लावण्याचा, तसेच त्यांच्याविरोधातील प्रकरणांचा, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी अपिलिय न्यायाधिकरणाचा स्थापन करण्यावर विचार होऊ शकतो, निर्णय ही घेण्यात येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

याशिवाय ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रॉयडिंगवर जीएसटी लागू शकतो. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या अध्यक्षतेखालील एका मंत्री गट याविषयीचा निर्णय घेणार आहे. त्याविषयीची चर्चा यापूर्वी या गटाने केली आहे. 17 डिसेंबर 2022 रोजीच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा होता.

1 फेब्रुवारी 2023 रोजी लोकसभेसमोर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सिगारेटवर 16 टक्के कर लावण्याची घोषणा केली. सिगारेटवर राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क (NCCD) आता 16 टक्के करण्यात आले आहे.

यापूर्वीच्या दोन अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सिगारेट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कोणताही कर लादला नव्हता. यावेळी सिगारेट उत्पादक कंपन्यांवर कर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता सिगारेटचे दर वाढणार आहे. अर्थात ही दरवाढ खूप मोठी नसणार.

तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सिगारेट कंपन्यांना सिगारेटच्या दरात 2 ते  3 टक्के वाढ करण्याची गरज आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे एका सिगारेटवरील कर 0.07 रुपयांहून 0.12 रुपये झाला आहे. त्यामुळे प्रति सिगारेट दरात फार मोठी वाढ होणार नाही.

एका अहवालानुसार, वर्ष 2020 मधील अर्थसंकल्पात सिगारेटच्या आकारानुसार एनसीसीडी 212 टक्क्यांहून 388 टक्के करण्यात आला होता. या वाढीनंतर कमी किंमतीचे सिगारेट पॅकेट 7 टक्क्यांनी वाढले होते. तर प्रिमियम पॅकेटच्या किंमतीत 5 टक्क्यांची भाव वाढ झाली होती.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.