तुम्हाला 25 लाखांची लॉटरी जिंकण्याचा मेसेज आलाय का? सावध व्हा, सत्य जाणून घ्या
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने ही माहिती दिलीय. जेव्हा व्यक्तीने दिलेल्या नंबरवर संपर्क साधून रकमेचा दावा केला जातो, तेव्हा गुन्हेगार लॉटरीच्या प्रक्रियेसाठी काही परत करण्यायोग्य रकमेसह जीएसटी भरावा लागेल, असं सांगतो. त्या व्यक्तीने ती रक्कम जमा केल्यावर ते इतर कोणत्या तरी बहाण्याने आणखी पैशांची मागणी करू लागतात. गुन्हेगार केवळ व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे संपर्क साधतात.
नवी दिल्लीः तुम्हाला 25 लाख रुपये जिंकल्याचा फोन, ई-मेल किंवा मेसेज आला आहे का? तर आताच सावध व्हा. कारण हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. तुम्ही याची काळजी घ्या. तुम्हाला फसवण्याचा हा एक मार्ग असू शकतो. पीआयबी फॅक्ट चेकने ही माहिती दिलीय. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट केले आहे की, फसवणूक करणारे फोन कॉल्स, ईमेल आणि मेसेजवर तुम्ही 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याचा खोटा दावा करत आहेत. त्याने हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे म्हटले आहे. अशा लॉटरी योजनांपासून सावध राहा, असेही त्यांनी स्पष्ट केलेय. अशा कॉल, मेल आणि मेसेजवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका. त्यामुळे तुम्हीही काळजी घ्या.
माणसांची फसवणूक कशी केली जाते?
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, गुन्हेगार अज्ञात क्रमांकावरून पीडितांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवतात, ज्यापैकी बहुतेक +92 ने सुरू होतात, जो पाकिस्तानचा ISD कोड आहे. त्याच्या मोबाईल नंबरने कौन बनेगा करोडपती आणि रिलायन्स जिओने संयुक्तपणे आयोजित केलेली 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकली. यामध्ये लॉटरीवर दावा करण्यासाठी त्यांना अशा व्यक्तीशी संपर्क साधावा लागेल, ज्याचा नंबर त्याच व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये देण्यात आलेला असतो.
गुन्हेगार केवळ व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे संपर्क साधतात
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने ही माहिती दिलीय. जेव्हा व्यक्तीने दिलेल्या नंबरवर संपर्क साधून रकमेचा दावा केला जातो, तेव्हा गुन्हेगार लॉटरीच्या प्रक्रियेसाठी काही परत करण्यायोग्य रकमेसह जीएसटी भरावा लागेल, असं सांगतो. त्या व्यक्तीने ती रक्कम जमा केल्यावर ते इतर कोणत्या तरी बहाण्याने आणखी पैशांची मागणी करू लागतात. गुन्हेगार केवळ व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे संपर्क साधतात.
पीआयबी फॅक्ट चेक म्हणजे काय?
PIB फॅक्ट चेक सरकारी धोरणे किंवा योजनांबद्दल खोट्या माहितीचे खंडन करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खोटी असल्याचा तुम्हाला संशय असल्यास तुम्ही पीआयबी फॅक्ट चेकला त्याबद्दल माहिती देऊ शकता, यासाठी तुम्ही 918799711259 या मोबाईल क्रमांकावर किंवा socialmedia@pib.gov.in या ईमेल आयडीवर पाठवू शकता.
संबंधित बातम्या
Bank Holidays: डिसेंबरमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, पटापट कामं उरका
LIC चा IPO कधी येणार, तुमच्यावर काय परिणाम होणार; जाणून घ्या