HDFC : शेअर बाजारावर एचडीएफसीचा डंका! विलीनीकरणाच्या फायद्याचं तुम्हाला नेमका काय लाभ?

विलीनीकरणामुळे (BANK MEGER) एचडीएफसी बँकेत एचडीएफसीची भागीदारी 41 टक्के असणार आहे. दरम्यान, विलिनीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेचा (RESEREV BANK OF INDIA) ग्रीन सिग्नल मिळणं आवश्यक ठरणार आहे.

HDFC : शेअर बाजारावर एचडीएफसीचा डंका! विलीनीकरणाच्या फायद्याचं तुम्हाला नेमका काय लाभ?
एचडीएफसी बँकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 9:21 PM

नवी दिल्ली : देशातील आघाडीची गृहवित्त कंपनी एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत (HDFC BANK) विलीनीकरण केले जाणार आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरशनच्या संचालक मंडळाने विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे नव्या फेरबदलामुळे ग्राहकांना देखील मोठा फायदा होणार आहे. विलीनीकरणामुळे (BANK MEGER) एचडीएफसी बँकेत एचडीएफसीची भागीदारी 41 टक्के असणार आहे. दरम्यान, विलिनीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेचा (RESEREV BANK OF INDIA) ग्रीन सिग्नल मिळणं आवश्यक ठरणार आहे. विलीनीकरणाच्या बातमीनं दोन्ही कंपन्यांचे शेअर्समध्ये बंपर तेजी नोंदविली गेली आहे. एका अहवालानुसार, एचडीएफसीचा पोर्टफोलिओ 6.23 लाख कोटींवर पोहोचला आहे.

एचडीएफसी बँकेचा एकूण पोर्टफोलिओ 19.38 लाख कोटींचा आहे. विलिनीकरणाच्या निर्णयामुळे एचडीएफसी बँकेच्या संपत्ती गुणवत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. असुरक्षित लोनचे प्रमाण घटण्याचा अंदाज निरीक्षकांनी वर्तविली आहे.

एचडीएफसी ग्रूप शेअर्समध्ये बूम

विलीनीकरणाच्या वृत्तामुळं दोन्ही शेअर्समध्ये तेजी नोंदविली गेली आहे. आज (सोमवारी) सकाळी 10 वाजता एचडीएफसी बँकेचा शेअर 10.25 टक्क्यांच्या वाढीसह 1660 रुपयांवर ट्रेड करत होता. एचडीएफसी शेअर 14.25 टक्क्यांच्या वाढीसह 2801 रुपयांवर ट्रेड करत होता.

एचडीएफसीचा डंका:

आज शेअरबाजार तीन महिन्यांच्या सर्वोच्च वाढीसह बंद झाला. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेत गेल्या 13 वर्षातील नोंदविलेली सर्वाधिक तेजी आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलिनीकरणाच्या चर्चेमुळे निफ्टी बँक 4 टक्क्यांच्या तेजीसह 38635 अंकांवर बंद झाली. फायनान्शियल्स सर्व्हिस इंडेक्समध्ये 4.64 टक्के आणि प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये 3.92 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली.

विलीनीकरणाचं नेमकं स्वरुप:

विलीनीकरण वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत पूर्ण होईल. एचडीएफसी बँक 100 टक्के सार्वजनिक भागधारकांच्या मालकीची असेल, तर एचडीएफसी लिमिटेडचे विद्यमान भागधारक एचडीएफसी बँकेच्या 41 टक्के मालकीचे असतील, असंही कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मुख्य उत्पादन म्हणून अखंडपणे गहाण ठेवण्याची ऑफर दिली जाईल. एचडीएफसी लिमिटेड, तिच्या दोन पूर्ण-मालकीच्या घटकांसह ज्यांच्याकडे उपकंपन्या आहेत त्यांचे एचडीएफसी बँकेच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 21 टक्के भांडवल आहे.

संबंधित बातम्या :

गुंतवणुकीची हीच वेळ! ज्येष्ठ नागरीक आणि ग्राहकांची चांदी; FDवर आकर्षक व्याजदर

मोठी घोषणा, एचडीएफसी आणि HDFC बँकेच्या विलीनीकरणास मान्यता, काय होणार परिणाम?

कोणत्या बँकेत RDसाठी जादा व्याजदर? ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठे गुंतवणूक चांगली, जाणून घ्या

पाहा व्हिडीओ :

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.