मुदत ठेव या परंपरागत गुंतवणुकीचे दिवस ही पालटतील आणि त्यावर तुम्हाला आकर्षक डील मिळले असा साधा विचार तरी आपल्या मनाला शिवला होता का, मंडळी? पण सध्याचे युग जाहिरातीचे आहे. त्याअनुषंगानेच एचडीएफसीने मुदत ठेवीवर ( FD) खास योजना आणली आहे. ऑनलॉईन मुदत ठेव सुरु करणा-या ग्राहकांना गिफ्ट कुपन मिळणार आहे. 7,500 रुपयांच्या एफडीवर ग्राहकांना 7,500 रुपयांचे लाभ मिळणार आहे. त्यासाठी कुपन व्हाऊचर देण्यात येतील. प्रोमो पिरियड अर्थात बँकेने योजना जाहीर केलेल्या कालावधीत एफडी सुरु करणा-या ग्राहकांसाठी ही योजना आहे. एचडीएफसी बँकेने अलीकडेच 12 जानेवारी 2022 रोजी व्याजदरात बदल केला आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवीवर व्याजदरात 5 ते 10 मुळ पाईंटपर्यंत हा व्याजदर वाढविण्यात आल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
युनिक एफडी
खासगी क्षेत्रातील प्रमुख सावकार असलेल्या एचडीएफसी बँकेने युनिक फिक्स्ड डिपॉझिट (Unique fixed deposit ) योजना सुरू केली आहे. या ऑफरअंतर्गत 7,500 रुपयांच्या मर्चंट ऑफर देण्यात येत आहेत. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी मुदत ठेवीत गुंतवणूक करणे बंधनकारक आहे.
नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग किंवा मोबाइल नंबर सारख्या ऑनलाइन माध्यमांद्वारे त्वरित बुकिंगचा वापर करून ग्राहकांना एफडी मिळू शकतात. ही ऑफर 17 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2022 दरम्यान केलेल्या एफडीसाठी वैध आहे आणि केवळ 7,500 रुपयांच्या ठेवींसाठी ही योजना वैध आहे.
एचडीएफसी बँकेच्या या एफडी ऑफरअंतर्गत किमान 1 वर्षासाठी एफडी असलेल्या ग्राहकांना बँकेकडून 7,500 कूपन व्हाउचर दिले जातील. हे व्हाउचर 30 जून 2022 पर्यंतच रिडीम(Redeem) करता येतील. आणि ग्राहकांना मुदत ठेव खाते उघडल्यानंतर 30 ते 90 दिवसांच्या दरम्यान कूपन व्हाउचर मिळतील. ज्या ग्राहकांचे केवायसी अद्ययावत करण्यात आलेले आहे. त्यांना या योजनेत सहभागी होता येईल. ऑफर व्हाउचरमध्ये एक डिस्काउंट कोड असेल जो ग्राहक रिडीम करू शकतात आणि वापरू शकतात. प्रोमो कालावधीदरम्यान सुरु केलेल्या मुदत ठेवीसाठीची ही योजना हे लक्षात घ्या.
बँकेकडे सर्व हक्क राखीव
एचडीएफसी बँकेने सदर योजनेत कोणतेही कारण न देता, पूर्वसूचना न देता आणि वेळोवेळी कोणताही प्रस्ताव मागे घेण्याचा/निलंबित/सुधारित/रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. कोणताही वाद असल्यास एचडीएफसी बँकेचा निर्णय बंधनकारक आणि अंतिम असेल.
एचडीएफसी बँक मुदत ठेवी व्याजदर
एचडीएफसी बँकेने 12 जानेवारी 2022 रोजी व्याजदरात बदल केला आहे. 2 वर्षांहून अधिक कालावधी असलेल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवीत 5 ते 10 बेसिस पॉइंटपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती एचडीएफसी बँकेने दिली आहे. 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंतच्या एफडींना 5.2 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्ष एफडीला 5.4 टक्के व्याज मिळेल आणि 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे एफडीला 5.6 टक्के व्याज मिळेल.
व्हाउचर रिडीम करण्याची प्रक्रिया
व्हाउचर/ऑफर मायक्रोसाइटवर सूचीबद्ध केल्या जातील जिथून ग्राहक कॅश करू शकतात. ग्राहकाला मायक्रोसाइट लिंक देण्यात येईल. त्यावर ग्राहक सर्व ऑफर एकाच वेळी पाहु शकतील. अथवा ग्राहक ‘गेट व्हाउचर्स’ वर क्लिक करतील. त्यानंतर पॉप-अपद्वारे दुसरे पेज ओपन होईल. तिथे ग्राहकाला त्याच्याशी संबंधित माहिती जसे की, त्याचे नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी यांची माहिती जमा करावी लागेल. दोन दिवसांच्या कार्यालयीन वेळेत ग्राहकाच्या ई-मेल आयडीवर व्हाऊचर पीडीएफ स्वरुपात पाठविले जाईल.
संबंधित बातम्या :
वर्ष 2022 ‘टाटागिरी’चं: उत्पादनात वाढ ते इलेक्ट्रॉनिक गाड्यांना वेटिंग, टाटा मोटर्सचा आत्मविश्वास!