HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट; RBI ने घेतला मोठा निर्णय, थेट होणार तुमच्यावर परिणाम

एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट करण्याची जबाबदारी ही बाहेरील व्यावसायिक आयटी फर्मकडे देण्यात आली आहे.

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट; RBI ने घेतला मोठा निर्णय, थेट होणार तुमच्यावर परिणाम
HDFC Bank
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 11:40 AM

मुंबई : मागच्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एचडीएफसी बँकेवर (HDFC Bank) नवीन डिजिटल सेवा सुरू करण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी घातली होती. यानंतर आता आरबीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेच्या संपूर्ण आयटी इन्फ्रास्ट्रक्चरचं ऑडिट करण्याची जबाबदारी ही बाहेरील व्यावसायिक आयटी फर्मकडे देण्यात आली आहे. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 30 (1) B अंतर्गत आरबीआयने हा निर्णय घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. (hdfc bank news rbi appoints it firm for audit of hdfc bank )

रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला डिजिटल 2.0 अंतर्गत सर्व डिजिटल बिजनेची निर्मिती करणारे उपक्रम थांबवण्यासाठी सांगितलं होतं. इतकंच नाहीतर नवीन क्रेडिट कार्ड देण्यावरही बंदी घालण्यात आली होती. जर बँकेने संबंधित सर्व नियमांचं पालन केलं तरच आरबीआय हे सर्व निर्बंध हटवेल अशीही माहिती देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

रिझर्व्ह बँकेने मागच्या महिन्यामध्ये एचडीएफसी बँकेवर नवी डिजिटल बँकिंक सेवा सुरू करणे आणि नवे क्रेडिट कार्ड ग्राहकांना देण्यावर बंदी घातली होती. मागच्या दोन वर्षात बँकेने सर्व बँकिंग सेवा गांभीर्याने घेते हा निर्णय घेतला होता. एचडीएफसी बँकेने शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबर 2020 रोजी रिझर्व्ह बँकेने हा आदेश जारी केला होता.

आरबीआयने का घेतला हा निर्णय?

खरंतर, एचडीएफसी बँकेत अनेक तांत्रिक अडचणीमुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. 2 डिसेंबर रोजी आरबीआयकडून हा आदेश देण्यात आला होता. तर हे सगळे निर्बंध उठवण्यासाठा बँकेला नियमांचं काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एचडीएफसी बँकेच्या नेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये मोठ्या अडचणी येत होत्या. याबद्दल ग्राहकांनी वारंवार तक्रारही केली होती. गेल्या महिन्यात उघड झालेल्या अहवालानुसार, एचडीएफसी बँकेच्या प्राथमिक डेटा सेंटरमध्ये पॉवर फेल्यूअर झाल्याचं सांगण्यात येत आहे.

आता ग्राहकांचं काय होणार ?

या निर्णयामुळे एचडीएफसी बँकेच्या आयटीमधील ज्या त्रुटी आहेत त्या स्पष्ट होतील, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. यामुळे ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी बँक सक्षम असेन. (hdfc bank news rbi appoints it firm for audit of hdfc bank )

संबंधित बातम्या – 

SBI v/s Post Office, मुदत ठेवींवर अर्थात FD वर सर्वाधिक व्याज कोण देते?

क्षणात गुंतवणुकदारांची संपत्ती 4 लाख कोटींनी वाढली, बजेटनंतर Stock Market ने मोडला रेकॉर्ड

बाजार भावापेक्षा 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे खास योजना

(hdfc bank news rbi appoints it firm for audit of hdfc bank )

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.