HDFC बँकेचा ग्राहकांना मोठा झटका, मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात

ज्या ग्राहकांनी मुदत ठेव केली आहे, त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

HDFC बँकेचा ग्राहकांना मोठा झटका, मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 12:50 PM

नवी दिल्ली : HDFC Bank FD Rates : देशातली सगळ्यात मोठी बँक एचडीएफसीने (HDFC Bank) त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. 15 ऑक्टोबरपासून बँकेने मुदत ठेवीवर (FD) असलेल्या व्याजदरात कपात केली आहे. यामुळे ज्या ग्राहकांनी मुदत ठेव केली आहे, त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँकेने फक्त एक ते दोन वर्षांसाठी केलेल्या मुदत ठेवीवर व्याजदर कपात केली आहे. या व्यतिरिक्त इतर मुदत ठेवीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (hdfc bank slashes fd interest rate know how many percent you get on fixed deposits)

10 ते 20 बेसिस पॉइंटमध्ये कपात एचडीएफसी बँकेने एक वर्षाची मुदत असलेल्या एफडीच्या रेटमध्ये 20 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. तर, दोन वर्षाचा अवधी असलेल्या एफडीमध्ये 10 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. त्यामुळे या कपातीनंतर नव्या एफडीचे रेट्स काय आहेत हे जाणून घेऊया…

असे आहे HDFC बँकेचे नवे एफडी रेट्स

– 7 दिवसांपासून ते 29 दिवसांच्या एफडीवर 2.50% व्याजदर आहे.

– 30 दिवसांपासून 90 दिवसांच्या एफडीवर 3% व्याजदर आहे.

– 91 दिवसांपासून ते 6 महिन्यांच्या एफडीवर 3.5% व्याजदर आहे.

– 6 महिन्यांपासून ते 364 दिवसांच्या एफडीवर 4.4% व्याजदर आहे.

– एक वर्षांची मॅच्यूअरिटी असलेल्या एफडीवर 4.9% व्याजदर आहे.

– दोन वर्षांची मॅच्यूअरिटी असलेल्या एफडीवर 5% व्याजदर आहे.

– दोन ते तीन वर्षांच्या एफडीवर 5.15% व्याजदर आहे.

– तीन ते पाच वर्षांच्या एफडीवर 5.30% व्याजदर आहे.

– 5 ते 10 वर्षांच्या एफडीवर 5.50% व्याजदर आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी किती असणार व्याजदर ? Senior citizens ना 50 बेसिस पॉइंट जास्त मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीत एफडीवर 3% ते 6.25% व्याजदर मिळतं.

या लोकांना मिळतं अधिक प्रीमियम जर एखादे ज्येष्ठ नागरिक 5 वर्षांसाठी एफडी करतात तर त्यांना 0.25 टक्क्यांचं अतिरिक्त प्रीमियम मिळतं. ही खास ऑफर ज्येष्ठ नागरिकांना 31 डिसेंबरपर्यंतच मिळणार आहे.

इतर बातम्या – 

Gold Price: दोन दिवसांत 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, पाहा आजचे नवे दर

पुण्यात पावसाचा हाहाकार, काळजाचा ठोका चुकवणारा भयानक VIDEO

(hdfc bank slashes fd interest rate know how many percent you get on fixed deposits)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.