AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market | गुंतवा बिनधास्त, चांगला परतावा हमखास, या शेअरमधून मिळतील तुम्हाला घसघशीत परतावा

शेअर मार्केटमध्ये हमखास परताव्याची स्वप्न सर्वच गुंतवणुकदार बघतात. परंतू, अँनेलिसीसमध्ये आणि गृहपाठात कमी पडलो तर आपला अंदाज हमखास चुकतो. परंतू, एचडीएफसी सिक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मने तुमच्या या चिंतेवर लाखमोलाचा सल्ला तर दिलाच आहे, परंतू लाखो रुपये कमाईची टिप्सही दिली आहे. काय आहे हा लाखमोलाचा सल्ला जाणून घेऊ

Share Market | गुंतवा बिनधास्त, चांगला परतावा हमखास, या शेअरमधून मिळतील तुम्हाला घसघशीत परतावा
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 10:23 AM

मुंबई : 2021 या वर्षाला अलविदा म्हणण्यासाठी बोटावर मोजण्याइतके दिवस उरले आहेत. कोरोना संकट गंभीर असतानाही सरत्या वर्षात शेअर बाजाराने अनेकांना मालामाल केले. जवळपास 20 टक्के परतावा दिला. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी (FII) ओमायक्रॉनच्या संकटात विक्री सुरुच ठेवली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधानांनी लसीकरण मोहिमेसोबतच बुस्टर डोसची घोषणा केल्याने आणि पुढील आठवड्यात बुस्टर डोसची सुरुवात होत असल्याने मार्केटमध्ये नवीन जोम पहायला मिळत आहे. ब्रोकिंग फर्म एचडीएफसी सिक्योरिटज यांनी सुचविलेल्या शेअरबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत, जे तुम्हाला भविष्यात चांगला परतावा मिळून देऊ शकतात. जाणून घेऊयात एचडीएफसी सिक्योरिटज यांनी केलेला दावा

हिंदुस्थान झिंक (Hindustan Zinc)

झिंक लेड आणि चांदीतील  हिंदुस्थान झिंक हा दमदार खेळाडू आहे. ऑटोमोटिव्ह, कंझ्युमर ड्युरेबल्स बॅटरी, घरगुती उपकरणे, निर्मिती आणि प्रक्रियावर स्टील इंडस्ट्रीज अवलंबून आहे. यामधील मंदीचा थेट परिणाम स्टीलच्या मागणीवर दिसून येतो. पर्यावरण संतुलन आणि यासंबंधीच्या जाचक अटी आणि नियमांचा सामना स्टील आयातदारांना करावा लागतो.

इप्का लॅबॉरेट्रीज ( Ipca lab)

एचडीएफसी सिक्युरीटीज यांनी त्यांच्या दमदार खेळाडूत इप्का लॅबॉरेट्रीजचा समावेश केला आहे. या फॉर्मा कंपनीसंबंधी एचएडीएफसी सिक्युरिटीज अनुकूल आहे. त्यांच्यादृष्टीने हा स्टॉक शेअर बाजारात लंबी रेस का घोडा असेल. औषधी निर्माण क्षेत्रातील या दादा कंपनीचे मजबूत व्हॅल्यूम ग्रोथ, एपीआई सेगमेंट मध्ये जोरदार व्यावसायिक मुसंडी मारण्याची शक्यता, प्रतिस्पर्धी आणि क्वालिटी, डेट फ्री बी/एस आणि मजबूत रिटर्न रेश्यो. युरोप आणि आशिया देशातील व्यापार या आधारे एचडीएफसी सिक्युरिटीज यांनी इप्का लॅबॉरेट्रीजला अनुकूलता दिली आहे. तरीही बाजारातील काही नकारात्मक स्थितीचा आणि अमेरिकेच्या एफडीएची भूमिका शेअरवर परिणाम करु शकते. एचडीएफसी सिक्युरिटीज यांनी त्यांच्या स्टॉकच्या यादीत इप्का लॅबॉरिट्रीज या दमदार शेअरचा समावेश केला आहे.

महिंद्रा आणि महिंद्रा

इलेक्ट्रीक व्हेईकल अर्थात इलेक्ट्रिक व्हीईकलमध्ये कंपनीची वाढ दर्शविण्यासाठी कंपनी एलसीवी, एसयूवी आणि 3 डब्ल्यूमध्ये 13 उत्पादने सुरु करण्याची शक्यता आहे. यात इलेक्ट्रिक व्हीईकलचा वाटा 20 टक्के असेल. 2027 पर्यंत 16 इलेक्ट्रीक वाहने मार्केटमध्ये उतरविण्याची योजना असून त्यातील 8 इलेक्ट्रिक एसयुवी आणि 8 कमर्शियल व्हीईकल असतील. कोविडच्या तिस-या लाटेचा परिणाम या कंपनीच्या शेअरवर दिसून येऊ शकतो.

आदित्य बिर्ला कॅपिटल

आदित्य बिर्ला कॅपिटल, ही सर्व वित्तीय सेवा पुरविणारी कंपनी आहे. आता तिची व्याप्ती वाढविण्याचे बिर्ला समुहाचे लक्ष् आहे. कंपनी त्यासाठी एक कॉमन प्लॅटफॉर्म तयार करत आहे. एकाच वित्त शाखेत एका छताखाली ग्राहकांना सर्व वित्तीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यामुळे कंपनीचे जवळपास 40 कोटी रुपये वाचणार आहेत. अनेक अल्प आर्थिक वित्तीय संस्था, स्टार्टअप नव्याने सुरु होत आहे. त्यांची कडवी स्पर्धा कंपनीसमोर आहे. तसेच अर्थव्यवस्थेची गती मंदावल्यास त्याचा परिणाम या कंपनीच्या शेअरवर दिसून येईल.

टेक महिंद्रा (Tech Mahindra)

टेक महिंद्राने 5G नेटवर्कमध्ये पाऊल ठेवलं आहे. या क्षेत्रात विस्तारीकरणाची मोठी योजना कंपनीने तयार केली आहे. त्यासाठीचा आरखडा तयार करण्यात आला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांतील तेजी, मुल्यांवरचा दबाव, नोकरी सोडणा-यांची वाढती संख्या आणि अनेक निर्बंधांचा परिणाम कंपनीवर होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

IPO Tracker | मेडिकेअर लिमिटेडचा लवकरच आयपीओ, 2 हजार कोटींचे उद्दिष्ट

पिळवणूकीविरोधात असंघटित कामगारांच्या आवाजाला धार, मोदी सरकारचे ‘समाधान’कारक पोर्टल

गुरु-शिष्याची बँकिंगमध्ये एन्ट्री, झुनझुनवाला-दमानींची ‘या’ बँकेत भागीदारी?

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.