Tata Group Profit : चहा-कॉपी आणि मीठ, म्हणायला किरकोळ जिन्नस! पण टाट समूहाची यातूनच कमाई, गुंतवणूकदार होणार मालामाल

Tata Group Profit : चहा-कॉपी आणि मीठ विक्रीतून टाटा समूहाने मोठी उलाढाल केली आहे. कंपनीने प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा कोट्यवधींचा निव्वळ नफा कमाविला आहे.

Tata Group Profit : चहा-कॉपी आणि मीठ, म्हणायला किरकोळ जिन्नस! पण टाट समूहाची यातूनच कमाई, गुंतवणूकदार होणार मालामाल
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 10:18 AM

नवी दिल्ली : टाटा समूह (Tata Group) मीठापासून ते विमान सेवेपर्यंत अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. अनेक जागतिक ब्रँड या समूहाने पंखाखाली घेतले आहे. या समूहाने मोठा विस्तार केला आहे. प्रत्येक प्रांतात, क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याचा खास प्रयत्न टाटा समूह करतो. टाटा समूह चहा, कॉपी आणि मीठाच्या उत्पादनातून कोट्यवधींची कमाई करत आहे. टाटा कंझ्युमर प्रोडक्टसने (Tata Consumer Products) कंपनीचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीला 268 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. गेल्या वर्षात याच तिमाहीत कंपनीला 217 कोटींचे नुकसान झाले होते. त्यातुलनेत आता 23 अधिक नफा झाला.

गुंतवणूकदारांना फायदा चौथ्या तिमाहीत ऑपरेशनल रेव्हेन्यूमध्ये वार्षिक आधारावर 14 टक्क्यांचा नफा दिसून आला आणि हा आकडा 3,619 कोटी रुपयांवर पोहचला. एका वर्षाच्या समान कालावधीत हा आकडा 3,175 कोटी रुपये होता. बोर्डाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8.45 रुपयांचा अंतिम लाभांश जाहीर केला. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर 30 दिवसांच्या आत त्याचा फायदा मिळेल. कंपनीने लाभांशाची घोषणा केल्याने गुंतवणूकदार मालामाल होतील. तसेच टाटाच्या अनेक शेअर्समध्ये पुन्हा तेजीचे सत्र येण्याची शक्यता असल्याने त्याचा फायदा मिळेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात मांड गेल्या तिमाहीत ब्रँड इंडियाचा महसूल 2,246 कोटी रुपये होता. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा महसूल 1,953 कोटी रुपये होता. त्यापेक्षा महसूलात 15 टक्क्यांची वाढ झाली. यादरम्यान आंतरराष्ट्रीय ब्रँडेड व्यवसायात 20 टक्के वाढ नोंदविण्यात आली. आंतरराष्ट्रीय व्यवसायाने 984 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत हा आकडा 890 कोटी रुपये होता. चौथ्या तिमाहीत नॉन ब्रँडेड बिझनेस महसूल 385 कोटी रुपये होता. त्यापेक्षा व्यवसायात 12 टक्के वाढ झाली. कंपनीने वार्षिक आधारावर 13 टक्के वृद्धीसह 518 कोटी रुपयांचा ऑपरेशनल लाभ नोंदविला.

हे सुद्धा वाचा

कॉफीतून मोठा महसूल टाटा स्टारबक्सने तिमाहीत 48 टक्क्यांचा महसूल मिळवला. आर्थिक वर्ष 2023 मधील वृद्धी 71 टक्क्यांपर्यंत आणली. व्यवसायासाठी आणि नफ्याच्या दृष्टीने हे ऐतिहासिक वर्ष असल्याचा दावा कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकात केला आहे. टाटा स्टारबक्सने वर्षभरात 71 नवीन स्टोअर खरेदी केले आणि 15 नवीन शहरात प्रवेश केला. आतापर्यंत एका वर्षांतील ही सर्वात मोठी कामगिरी आहे. त्यामुळे 41 शहरांतील दुकानांची संख्या 333 इतकी झाली आहे. कंपनीने या क्षेत्रात आता चांगलीच मांड ठोकली आहे. कंपनीला यामधून मोठा महसूल तर मिळालाच आहे. पण ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याने व्यवसाय विस्तारावरही विचार सुरु आहे. चहा आणि मीठातूनही कंपनीला मोठा फायदा झाला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.