AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Insurance : भूकंप, महापूर अथवा घरावर पडू द्या दरोडा, हा विमा असेल तर होईल फायदा

Home Insurance : हा विमा असताना आता कसली चिंता..

Home Insurance : भूकंप, महापूर अथवा घरावर पडू द्या दरोडा, हा विमा असेल तर होईल फायदा
नुकसान भरपाई मिळणारImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 15, 2022 | 7:34 PM
Share

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या (Inflation) काळात प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्न असते. अशावेळी घराच्या सुरक्षेसाठी गृह विमा असणे आवश्यक आहे. होम इन्शुरन्स (Home Insurance) नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीपासून तुमचे रक्षणच करत नाही तर आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देतात. या विम्यात घराच्या सुरक्षेसह घरातील वस्तूंनाही विम्याचे कवच मिळते.

या योजनेत भूंकप, महापूर आणि नैसर्गित आपत्तीत (Natural Disasters) घराचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई या विम्यातून मिळते. हा विमा नुकसान भरून काढू शकतो. त्यासाठीच्या रक्कमेची तजवीज या विम्याच्या माध्यमातून करण्यात येते.

या सुविधांसाठी तुम्ही पण गृह विमा, घराचा विमा काढू शकतात. त्यामुळे तुम्हाला घराचे नुकसान भरपाई मिळू शकते. यासोबतच चोरी, दरोडा अथवा छोट्या-मोठ्या वस्तूंचे नुकसान झाल्यास, विम्यातून त्याची भरपाई मिळू शकते.

जीवन विमा (Life Insurance) मृत्यूनंतर पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला हमी रक्कम देते. तसेच घराचा विमा ही घरासंबंधीची नुकसान भरपाई मिळवून देतो. नैसर्गिक आपत्तीसह इतर सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई करणारा चांगला प्लॅन यासाठी तुम्हाला निवडता येतो.

आग लागणे, नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास तुम्हाला या विमा योजनेतंर्गत नुकसान भरपाईसाठी दावा सांगता येतो. तुम्हाला भाडेकरुसाठी विमा, घराच्या मालकासाठी विमा, सर्वसमावेशक विमा, घरातील सामान, साहित्यासाठीचा विमा, घराची देखभाल आणि पूनर्बांधणीसाठीचा विमा उतरविता येतो.

घरासाठीचा विमा कोणालाही घेता येतो. या विम्यातंर्गत आर्थिक मदत देण्यात येते. या विम्याचा फायदा घेण्यासाठी नियमीत प्रीमिअम जमा करावा लागतो. हा विमा घरासह, गॅरेज, हॉल, परिसर इत्यादीसाठीही घेता येतो. अॅड ऑन सुविधेत फर्निचर आणि अन्य उत्पादनांसाठी विमा घेता येतो.

नैसर्गिक आपत्तीत घरांचे मोठे नुकसान होऊ शकते. अशावेळी हा विमा पूर्ण घराला सुरक्षा देण्यासोबतच नुकसान भरपाई मिळवू देतो. यामुळे तुम्हाला अधिक नुकसान होत नाही. एक मोठी रक्कम तुम्हाला मिळते.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.