कोरोना काळात PF अकाउंटमधून पैसे काढता येतील, तीन दिवसात पैसे मिळतील, पण कसे? ते वाचा

देशभरातील हजारो कुटुंब आज कोरोना संकटाशी झुंजत आहेत. अनेकांना पैशांची गरज भासत असेल (how can withdraw money from PF account during corona pandemic).

कोरोना काळात PF अकाउंटमधून पैसे काढता येतील, तीन दिवसात पैसे मिळतील, पण कसे? ते वाचा
PF balance EPFO
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 4:05 PM

मुंबई : देशभरातील हजारो कुटुंब आज कोरोना संकटाशी झुंजत आहेत. अनेकांना पैशांची गरज भासत असेल. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असतील. मात्र, उपचारासाठी आणि खर्चासाठी पैसे लागत असतील. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटमधील पैसे काढू शकता. यासाठी नेमकी काय प्रक्रिया करावी लागेल याबाबतची सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (how can withdraw money from PF account during corona pandemic).

पीएफमधून पैसे कधी काढू शकता?

मनी 9 च्या रिपोर्टनुसार, केंद्र सरकारने गेल्या वर्षापासून कोविड केअरसाठी पीएफ अकाउंटमधील पैसे काढण्यासाठी अनुमती दिली आहे. त्यामुळे कुटुंबातील कुणावरही उपचार करण्यासाठी पैशांची गरज भासली तर तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटमधून पैसे काढू शकता. या पैशांना तुम्ही आगदी सोप्या पद्धतीत काढू शकतात. तसेच या पैशांची परतफेड करण्याची काहीच आवश्यकता नसते. कारण ते तुमच्या हक्काचेच असतात.

कोरोना काळात पीएफमधून किती पैसे काढता येतील?

कोरोना काळात तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटमधून 75 टक्के रक्कम काढू शकतात. याशिवाय ही रक्कम तुमच्या तीन महिन्याचा पगारापेक्षा कमी असावी. जसे की समजा, तुमचा पगार 20 हजार आहे आणि तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये 1 लाख रुपये आहेत. तर तुम्ही 60 हजार रुपये रक्कम काढू शकता.

किती दिवसात पैसे येतात ?

कोरोना काळात तुम्ही पीएफ अकाउंटमधून पैशांसाठी अर्ज केला तर वर्किंग डेच्या तीन दिवसात तुम्हाला पैसे मिळण्यासाठी प्रकिया पूर्ण होते. त्यानंतर बँकेत संबंधित रकमेचा चेक दिला जातो. हा चेक बँक जास्तीत जास्त एक दिवसात क्लिअर करते. त्यामुळे ही रक्कम तुम्हाला तीन ते पाच दिवसांच्या कालावधीत मिळते.

पैसे कसे मिळवायचे?

पीएफचे पैसे मिळवायचे असतील तर पीएफच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन क्लेमसाठी विनंती करावी लागेल. याशिवाय तुम्ही उमंग अॅप्लीकेशनच्या माध्यमातून अप्लाय करु शकता. मात्र, हे पैसे तुम्हाला मेडिकल एमरजन्सी काळातच मिळू शकतात (how can withdraw money from PF account during corona pandemic).

हेही वाचा : Gold Price Today | सोन्याच्या किंमती पुन्हा वधारल्या! जाणून घ्या 10 ग्रॅमचा आजचा भाव…

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.