बायबॅकमुळे गुंतवणूकदारांना कसा फायदा होतो?

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या मार्केट प्राईजपेक्षा अधिक बायबॅक प्राईज जाहीर करतात.

बायबॅकमुळे गुंतवणूकदारांना कसा फायदा होतो?
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 4:58 PM

मुंबई : विद्या चार्टर्ड अकॉउंटन्ट असून ती नोएडामध्ये राहते. ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करते. तिला सध्या एक आनंदाची बातमी मिळाली. विद्याने इन्फोसिसचे शेअर खरेदी केले होते आणि कंपनीने ९३०० कोटींचं बायबॅक जाहीर केले आहे. बायबॅकच्या गोषणेनंतर इन्फोसिसच्या शेअरमध्ये तेजी आली आणि विद्याला चांगला रिटर्न मिळाला.

आता बायबॅक म्हणजे नक्की काय?

ज्यावेळेला कंपनीला मार्केटमधील शेअर्सची संख्या कमी करायची असते, त्यावेळेला कंपनी स्वतः शेअर्स खरेदी करते. या प्रक्रियेला बायबॅक म्हणतात. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या मार्केट प्राईजपेक्षा अधिक बायबॅक प्राईज जाहीर करतात.

२०२२ मध्ये मोठ्या प्रमाणावर बायबॅक करण्यात आले. या वर्षात, ५२ कंपन्यांनी ३८,३६९ कोटी रुपयांचे बायबॅक जाहीर केले आहेत. २०२१ मध्ये, ४२ कंपन्यांनी १४,३४१ कोटींच्या बायबॅकची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात १३,५६८ कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅकमध्ये खरेदी करण्यात आले. तर २०२२ मध्ये, घोषणा झालेल्या ३८,३६९ कोटींच्या बायबॅकपैकी प्रत्यक्षात २७,२९३ कोटींचे शेअर्स खरेदी करण्यात आले आहेत. २०२२ मध्ये झालेल्या एकूण बायबॅकपैकी २ तृतीयांश बायबॅक IT कंपन्यांनी केले आहेत.

या वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बायबॅक का करण्यात आले हा प्रश्न तुम्हाला पडला असेल डिविडेंड देण्यापेक्षा, शेअरहोल्डरला बायबॅकच्या स्वरूपात परतावा देणं हा चांगला पर्याय आहे असं मत तेजीमंदी चे रिसर्च हेड अनमोल दास यांनी व्यक्त केलं आहे. कंपनीकडे अतिरिक्त कॅश असेल आणि कोणीतरी आपली कंपनी खरेदी करू नये असं वाटत असेल तर प्रोमोटर बायबॅकचा पर्याय निवडतात. यामुळे, प्रोमोटरची कंपनीमधील हिस्सेदारी वाढते. बायबॅकच्या माध्यमातून कंपनीच्या शेअर्सचं व्हॅल्युएशन वाढवण्याचादेखील प्रयत्न केला जातो.

बायबॅकमुळे गुंतवणूकदारांना कसा फायदा होतो ते बघूया. बायबॅकमध्ये आपण सहभागी व्हावं का नाही ते हि बघूया. सगळ्यात आधी बायबॅकच्या कोणत्या २ प्रक्रिया आहेत ते आपल्याला माहित असलं पाहिजे. एक प्रकार आहे टेंडर रूट आणि दुसरा आहे ओपन मार्केट रूट.

२०२२ मध्ये ओपन मार्केट रूटच्या माध्यमातून झालेल्या बायबॅकपेक्षा टेंडर रूटच्या माध्यमातून झालेल्या बायबॅकमधून अधिक फायदा झाला आहे. मात्र, टेंडर रूटच्या माध्मयटाऊन होणाऱ्या बायबॅकमध्ये मिळणार परतावा acceptance ratio वर अवलंबून असतो.

Acceptance ratio म्हणजे तुमच्याकडे असलेल्या शेअर्सपैकी किती टक्के शेअर्स बायबॅकमध्ये खरेदी केले जातील. उदारणार्थ, तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे १०० शेअर्स असतील आणि acceptance श ४०% असेल तर बायबॅकमध्ये तुमचे ४० शेअर्स खरेदी केले जातील.

टेंडर रूटमधून बायबॅक झालेल्या TCS, GAIL, MOIL, Tanla Platforms आणि GAIL या शेअर्सनी १५ ते ७३% रिटर्न दिला आहे.

तर ओपन मार्केट रुतमधून बायबॅक झालेल्या Bajaj Consumer, Emami, Bajaj Auto, Kaveri Seed, Balrampur Chini या शेअर्सनी २.६ ते १७.५% रिटर्न दिला आहे.

एकंदरीत विचार केल्यास, ओपन मार्केट रुटपेक्षा टेंडर रूटमधून झालेल्या बायबॅकनी अधिक रिटर्न दिला आहे. या आकडेवारीतून एक स्पष्ट होतंय कि, बायबॅकच्या घोषणेनंतर शेअरच्या किमती वाढतात. टेंडर रुतमधून होणार बायबॅक असेल तर शेअरच्या किमती अधिक वाढतात. ज्यावेळेला एखादी कंपनी बायबॅकची घोषणा करेल, त्यावेळेला आपल्याला त्यातून निश्चित फायदा करून घेता येईल.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....