45 व्या वर्षापर्यंत 5 कोटी रुपयांची बचत हवीये? SIP मध्ये किती गुंतवणूक कराल?
यासाठी तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी लागेल, ज्यामध्ये तुम्ही 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवू शकता. (How much invest in SIP to accumulate 5 crore rupees)
मुंबई : आपल्या घरात लहानपणापासूनच पैसे जमा करण्याची शिकवण दिली जाते. त्यानुसार लहान मूल पिगी बँकेत पैसे जमा करतात. तर तरुण मंडळी हे बचत म्हणून म्युच्यूअल फंड किंवा शेअर्समध्ये पैसे गुंतवतात. तर वृद्ध मंडळी हे भविष्यातील खर्च लक्षात घेऊन पीपीएफ, बचत आणि एफडीमध्ये गुंतवणूक करतात. या सर्वांच्या मागचे उद्दिष्ट एकच असते ते म्हणेज निवृत्त झाल्यावर किंवा उतारवयात आपलं जीवन आनंदी घालवता येईल. (How much invest in SIP to accumulate 5 crore rupees after retirement know all details)
सध्या म्युच्युअल फंडात गुंतवणूकीत वाढ होत आहे. यात जास्त जोखीम नसली तरी थोडे थोडे पैसे जोडून तुम्ही मोठी रक्कम जमा करु शकता. यासाठी तुम्हाला एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी लागेल, ज्यामध्ये तुम्ही 500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवू शकता.
सध्या एक 32 वर्षीय व्यक्ती वयाच्या 24 व्या वर्षीपासून गुंतवणूक करत आहे. सध्या त्यांच्याकडे म्युच्युअल फंड आणि इक्विटी फंड मिळून 18 लाखांचा निधी उपलब्ध आहे. त्याने 9 विविध म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असून यात आदित्य बिर्ला लाँग टर्म ग्रोथ, अॅक्सिस लाँग टर्म इक्विटी, फ्रँकलिन टेम्पलटन स्मॉल कॅप सारख्या फंडचा समावेश आहे. हे सर्व फंड 11-17 टक्के परतावा देत आहेत. त्यामुळे सध्या त्यांची टेक होम सॅलरी 1,10,000 रुपये आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतीही SIP नाही.
पण सध्या त्यांना त्याचा पोर्टफोलिओ बदलायचा असून त्यांना SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे. त्यांचे लक्ष्य 45 वर्षापर्यंत 5 कोटी जमा करणे हे आहे. तसेच कोणतेही कर्ज असू नये असेही त्यांचे मत आहे.
किती कमाई होते?
यानुसार संबंधित वरील व्यक्ती हा काही वर्षात रिटायर होणार आहे, हे स्पष्ट होत आहे. म्हणजे या गुंतवणूकीतून जमा झालेल्या रक्कमेतून त्याला त्याचे उर्वरित जीवन घालवायचे आहे. तसेच ज्यांना लवकर निवृत्तीची इच्छा असते ते अधिक लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. मात्र 45 वर्षानंतर ती गुंतवणूक कुठपर्यंत पोहोचले याचा व्याज दरानुसार किती ठेवी असू शकते याचा अंदाज लावूया.
आता जे ज्या पद्धतीने गुंतवणूक करत आहेत, त्यानुसार आपण 10 टक्के व्याजानुसार 45 वर्षांत त्यांच्याकडे 62 लाख रुपये होतील. तर 12 टक्के व्याजानुसार 78.50 लाख रुपये जमा केला जाऊ शकतो. यामुळे जर ठेवीची रक्कम 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवायची असेल तर त्यांना दर महिन्याला 1.41 लाख रुपये जमा करावे लागतील. तर 12 टक्के व्याजानुसार त्यांना 1.17 लाख रुपये मिळतील.
किती पैसे जमा करावे?
सध्या या व्यक्तीला दर महिना 25 हजार रुपये ईएमआयमध्ये द्यावा लागतो. या व्यक्तीचा पगार हा 1,10,000 रुपये आहे. त्यानुसार ईएमआय भरल्यानंतर त्यांच्याकडे 85 हजार रुपये शिल्लक राहतात. या पैशातून घरखर्चासाठीची 25-30 टक्के वगळली तर त्यांच्याकडे 60 हजार रुपये शिल्लक राहतत.
जर तुम्ही ही रक्कम इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवली तर 45 वर्षांच्या अखेरीस तुम्ही 10 टक्के व्याजदराने 1.85 कोटी आणि 12 टक्के व्याजदराने 2.14 कोटी रुपये जमा करू शकाल. जर आपण त्यात सध्याची गुंतवणूक जोडली तर 45 वर्षे येईपर्यंत ही रक्कम 2.5 किंवा 3 कोटी रुपये होऊ शकते.
SIP मध्ये किती गुंतवणूक करावी?
त्यामुळे अशा परिस्थितीत एकतर तुम्हाला सेवानिवृत्तीचे वय 45 वर्षांच्या पुढे वाढवावे लागले किंवा दरमहा गुंतवणूकीची रक्कम वाढवा. तरच तुमच्याकडे 5 कोटींचा निधी जमा होईल. दरमहा ईएमआय भरल्यानंतर तुम्ही त्यातील अधिक हिस्सा इक्विटी किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवला तर 5 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण होईल. तसेच जर तुम्ही दरवर्षी तुमच्या म्युच्युअल फंडामध्ये 16 टक्क्यांनी वाढ केली तर 45 वर्षांच्या अखेरीस तुम्ही 5 कोटी रुपये जमा करू शकता. (How much invest in SIP to accumulate 5 crore rupees after retirement know all details)
पोस्ट ऑफिस की बँक, कुठे होतील पैसे झटपट दुप्पट, जाणून घ्याhttps://t.co/H4uPueVWDe #PostOffice #Bank #savingmoney
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2021
संबंधित बातम्या :
Petrol & Diesel: पेट्रोल आणि डिझलेच्या दरात पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या आजचा दर