50 लाख ते 200 अब्ज डॉलरपर्यंतचा प्रवास, मुकेश अंबानींच्या यशाचं रहस्य उघड
मुकेश अंबानींच्या नेतृत्वात कंपनीने 200 अब्ज डॉलरचा टप्पा गाठला आहे. याविषयी स्वतः मुकेश अंबानी यांनीच सांगितलं आहे.
मुंबई : प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर कुणासारखं यश मिळवायचं याचं एक उदाहरणही ठरवलेलं असतं. असंच एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ‘मुकेश अंबानी’. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक असलेले मुकेश अंबानी अनेकांसाठी एक प्रेरणा स्थान आहे (How Reliance reach on 200 billion dollar market CAP company Mukesh Ambani reveals secret).
मुकेश अंबानी यांनी रिलायन्सची जबाबदारी स्वीकारली तेव्हा कंपनीचं मूल्यं 50 लाख रुपयांच्या आसपास होतं. मात्र, त्यानंतर मुकेश अंबानींच्या नेतृत्वात कंपनीने 200 अब्ज डॉलरचा टप्पा गाठला आहे. याविषयी स्वतः मुकेश अंबानी यांनीच सांगितलं आहे.
मुकेश अंबानी ‘पोर्ट्रेट ऑफ पॉवर: हाफ अ सेंचुरी ऑफ बीइंग अॅट रिंगसाईड’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी आपल्या उद्योग जगतातील प्रवासाविषयी माहिती दिली. त्यांनी आपल्या सर्व यशाचं श्रेय वडील धीरुभाई अंबानी यांना दिलं. ते म्हणाले, “माझे वडील धीरुभाई अंबानी यांच्या दुरदृष्टीमुळेच केवळ काही रुपयांपासून सुरु केलेला व्यवसाय आज एक मोठं साम्राज्य झालं आहे.”
जिओची प्रेरणा देखील वडील धीरुभाई अंबानींकडूनच
मुकेश अंबानी यांनी आपल्याला जिओची प्रेरणा देखील वडिलांकडूनच मिळाल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “मला जिओची प्रेरणा वडिलांकडूनच मिळाली. ते म्हणायचे की आपल्याला केवळ टेक्सटाईल बिजनेसमध्ये राहून चालणार नाही. पुढच्या पीढिच्या विचार आणि बुद्धीमत्तेत गुंतवणूक करायला हवी. याच विचाराने रिलायन्सने डिजिटल क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.”
50 लाख पासून 200 अब्ज डॉलरचा प्रवास
आजपासून बरोबर 3 वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांना इंटरनॅशनल अॅडवर्टाइजिंग असोसिएशन अॅवॉर्ड कार्यक्रमात बिजनेस लिडर ऑफ द ईअर पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपल्या नेतृत्वातील काही अनुभव सांगितले होते.
ते म्हणाले, “मी खूप नशिबवान आहे की मला सुरुवातीपासून रिलायन्समध्ये काम करता आलं. मला आठवतंय की मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मी एक केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो. त्यावेळी रिलायन्सचं एन्टरप्राईज वॅल्यू 50 लाखपेक्षा कमी होतं. आता 40 वर्षांनी एक भारतीय कंपनी म्हणून आम्ही 200 अब्ज डॉलरची एन्टरप्राईज आहोत. हा एक खूप अद्भूत प्रवास होता आणि पुढेही राहिल.”
हेही वाचा :
COVID Test | रिलायन्सची नवी RT-PCR टेस्ट किट, दोन तासात कोरोनाचा अहवाल कळणार
How Reliance reach on 200 billion dollar market CAP company Mukesh Ambani reveals secret