नव्या वर्षात Amul ची फ्रँचायझी घ्या, बिझनेस सुरु करा, 2 लाखांच्या गुंतवणुकीवर 10 लाखापर्यंत कमवा

अमूलची फ्रँचायझी घेऊन फायद्याचा व्यवहार करु शकता. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोणतीही कटकट नाही.

नव्या वर्षात Amul ची फ्रँचायझी घ्या, बिझनेस सुरु करा, 2 लाखांच्या गुंतवणुकीवर 10 लाखापर्यंत कमवा
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 12:14 PM

मुंबई : नव्या वर्षात जर तुम्ही बिझनेसचा विचार करत असाल, तर तुमच्यासमोर चांगला पर्याय आहे. स्वत:चा छोटा-मोठा व्यवसाय सुरु करुन तुम्ही लाखो रुपयांची कमाई करु शकता. डेअरी प्रोडक्टमधील प्रसिद्ध कंपनी अमूलसोबत (Amul Franchise) व्यवसाय करण्याची संधी आहे. अमूल नव्या वर्षातही फ्रँचायझी देत आहे. छोटी गुंतवणूक करुन महिन्याला नियमित कमाई होऊ शकते. अमूलची फ्रँचायझी घेऊन फायद्याचा व्यवहार करु शकता. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कोणतीही कटकट नाही. (How to  apply for a Amul Franchise, profit, Outlet and all about to know)

ना रॉयल्टी, ना नफ्याची विभागणी 

अमूल कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रँचायझी ऑफर करत आहे. इतकंच नाही तर अमूलची फ्रँचायझी घेण्याचा खर्चही खूपच कमी आहे. तुम्ही केवळ 2 लाखपासून ते 6 लाखापर्यंत खर्च करुन, तुमचा व्यवसाय सुरु करु शकता. व्यवसायाच्या सुरुवातीलाच तुम्ही चांगला नफा कमवू शकता.

नेमकी गुंतवणूक किती करावी लागेल? 

अमूल दोनप्रकारच्या फ्रँचायझी देत आहे. जर तुम्ही अमूल आऊटलेट (Amul Outlet), अमेल रेल्वे पार्लर ( Amul Railway Parlor) किंवा अमूल किओस्कची (Amul Kiosk) फ्रँचायझी घेणार असाल, तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास 2 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून 25 हजार रुपये (म्हणजे परत न मिळण्याच्या अटीवर), तर रिनोवेशन अर्थात नुतनीकरणासाठी 1 लाख रुपये आणि साधनसामुग्रीसाठी 75 हजार रुपयांचा खर्च येईल. याबाबतची अधिक माहिती तुम्हाला फ्रँचायझी पेजवर मिळू शकेल.

दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये किती गुंतवणूक?

जर तुम्हाला अमूल आयस्क्रीम पार्लर चालवायचं असेल, त्यासाठी तुम्हाला फ्रँचायजी हवी असेल तर त्यासाठी थोडी जास्त गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच तुम्हाला 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये ब्रँड सिक्युरिटी 50 हजार, रिनोवेशन अर्थात नुतनीकरणासाठी 4 लाख रुपये आणि साधनसामुग्रीसाठी 1 लाख 50 हजार रुपये खर्च येईल.

कमाई किती?

अमूलच्या मते, फ्रँचायजीद्वारे दर महिन्याला 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. मात्र कोणत्याही व्यवसायासाठी जागा/ ठिकाण महत्त्वाचं असतं. अमूलचं आऊटलेट सुरु केल्यानंतर, कंपनी अमूलच्या उत्पादनावर किमान विक्री किंमत अर्थात MRP वर कमिशन देते. यामध्ये एका दुधाच्या पिशवीवर 2.5 टक्के, दूध उत्पादनावर 10 टक्के आणि आयस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळतं.

आयस्क्रीम स्कूपिंग पार्लरच्या फ्रँचायझीवरही मोठं कमिशन दिलं जातं. आयस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन दिलं जातं. प्री पॅक्ड आयस्क्रिमवर 20 टक्के, अमूल प्रोडक्टवर 10 टक्के असं कमिशनचं गणित आहे.

फ्रँचायझी घेण्यासाठी नियम-अटी काय?

जर तुम्हाला अमूल आऊटलेट फँचायझी घ्यायची असेल तर तुमच्याकडे किमान 150 स्क्वेअर फूट जागा हवी. जर इतकी जागा असेल तर तुम्हाला फ्रँचायझी मिळू शकते. आयस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी ही अट 300 स्क्वेअरफूट जागेची आहे. यापेक्षा कमी जागा असेल तर तुम्हाला फ्रँचायझी मिळू शकणार नाही.

अमूलकडून कोणती मदत मिळेल?

अमूलकडून तुम्हाला कंपनीची ओळख दिली जाईल. सर्व साहित्य आणि ब्रँडिगवर सबसिडी मिळेल. त्याशिवाय सुरुवात करण्यासाठी विशेष मदत केली जाईल. जास्त माल खरेदी केल्यावर डिस्काऊंट मिळेल. ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर दिल्या जातील. याशिवाय मालक किंवा कर्मचाऱ्याला ट्रेनिंग दिलं जाईल. तुमच्यापर्यंत उत्पादनं पोहोचवण्याची जबाबदारी अमूलची असेल. अमूलकडून प्रत्येक मोठी शहरं, जिल्ह्याच्या ठिकाणांवर होलसेल डीलर्स नियुक्त केले आहेत. हे डीलर्स तुमच्यापर्यंत उत्पादनं पोहोचवतील.

फ्रँचायझीसाठी अर्ज कुठे करायचा?

जर तुम्हाला अमूलची फ्रँचायझी हवी असेल retail@amul.coop यावर मेल करावा लागेल.

सर्व तपशील डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी अमूलच्या वेबसाईटला भेट द्या. http://amul.com/m/amul-scooping-parlours

टीप – वरील माहिती ही अमूलच्या वेबसाईटवरील आहे. अपडेट तपशील जाणून घेण्यासाठी अमूलच्या वेबसाईटला भेट द्या.

(How to  apply for a Amul franchise, profit, Outlet and all about to know)

संबंधित बातम्या 

Gold-Silver Price Today | नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भाव घसरला! पाहा आजचे दर…  

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.