पॅनकार्ड हरवलंय चिंता करु नका, इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर अर्ज करा, 10 मिनिटांत अडचण दूर

सुरुवातीच्या काळामध्ये नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी बराच वेळ लागत होता. मात्र, आता नवीन पॅन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेसाठी जास्त वेळ किंवा काळ जात नाही. PAN Card

पॅनकार्ड हरवलंय चिंता करु नका, इन्कम टॅक्स विभागाच्या पोर्टलवर अर्ज करा, 10 मिनिटांत अडचण दूर
पॅन कार्ड
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 6:53 PM

नवी दिल्ली: आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड (PAN Card) आवश्यक असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी बराच वेळ लागत होता. मात्र, आता नवीन पॅन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेसाठी जास्त वेळ किंवा काळ जात नाही. मात्र, तुमचं पॅन कार्ड चोरी झालं किंवा हरवलं असेल तर तुमच्या समोर अडचणी निर्माण होत असे. मात्र, आता या अडचणी येणार नाहीत. तुम्ही इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवरुन काही मिनिटांमध्ये इन्स्टंट पॅन कार्ड जनरेट करू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला तुमच्या पॅनकार्डचा नंबर माहिती असणं आवश्यक आहे. ज्या व्यक्तींकडे पॅन नंबर उपलब्ध नसेल ते दुसऱ्या पद्धतीचा वापर करुन पॅन कार्ड काढू शकतात. (How to get instant Pan Card if you lost PAN Card get instant pan through new income tax portal)

पॅन नंबर म्हणजे काय?

आयकर विभागाकडून प्रत्येक नागरिकाला दहा अंकी क्रमांक असलेला कायम खाते नंबर दिला जातो. त्याला परमनंट अकाऊंट नंबर असंदेखील म्हणलं जातं. इन्स्टंट पॅन कार्ड साठी आधार कार्ड द्वारे अर्ज केल्यास दहा मिनिटांमध्ये पीडीएफ फॉरमॅटमध्ये आधार कार्ड आपल्याला मिळून जाते.

काही मिनिटांमध्ये पॅन कार्ड कसे बनवायचे?

स्टेप 1: सर्वप्रथम इन्कम टॅक्स विभागाच्या ई फाइलिंग पोर्टलला भेट द्या. स्टेप 2: इथे इन्स्टंट पॅन कार्ड आधार या ऑप्शन वर क्लिक करा. स्टेप 3: ज्या व्यक्तींना पॅनकार्ड नंबर माहिती नाही ते आधार कार्डची माहिती भरून पॅन कार्ड डाऊनलोड करु शकतात. मात्र, अशावेळी पॅन आणि आधार लिंक असणं आवश्यक आहे. स्टेप: 4 यानंतर स्क्रीनवरील नियम वाचून मान्य असल्याचं नमूद करा. स्टेप 5: यानंतर तुमच्य नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी क्रमांक येईल तो नोंदवा. स्टेप 6 : फॉर्ममध्ये तुमचा ई-मेल नोंद करा आणि त्यानंतर सर्व माहिती भरुन सबमिट बटनवर क्लिक करा. स्टेप 7: यानंतर आयकर विभाग ईमेल आयडीवर इन्स्टंट पॅन कार्ड येईल, ते पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करु शकता.

10 मिनिटांमध्ये इन्स्टंट पॅनकार्ड मिळणार

इन्स्टंट पॅनकार्ड ही मूळ पॅनकार्डची सॉफ्ट कॉपी समजली जाते. सरकारी कामकाजामध्ये पॅनकार्ड महत्वाचं समजलं जाते. इन्स्टंट पॅनकार्डसाठी अर्ज केल्यानंतर ते 10 मिनिटांमध्ये मिळू शकते. तुम्ही अर्ज दाखल केल्यानंतर कॅपचा कोड टाकून आधार ओटीपी जनरेट करा तो तुमच्या मोबाईल फोनवर येईल त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करा आणि आधार डिटेल्स प्रमाणित करा.यानंतर तुम्ही पॅन कार्ड डाउनलोड करु शकता. तुम्ही पॅन कार्ड पीडीएफ फॉरमॅट मध्ये डाऊनलोड करू शकता. यासाठी चेक स्टेटस किंवा डाऊनलोड पॅनवर तुमचा आधार नंबर नोंदवावा लागेल. याशिवाय तुमचा ई-मेल आयडी आधार क्रमांकाशी संलग्न असेल तर तुम्हाला पीडीएफ फॉर्मेट मधील पॅनकार्ड इमेल वर देखील उपलब्ध होईल.

संबंधित बातम्या:

पॅनकार्ड मोफत मिळतेय अवघ्या 10 मिनिटांमध्ये, इन्कम टॅक्स विभागाच्या सेवेबद्दल जाणून घ्या

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधार कार्ड, पॅनकार्ड, व्होटिंग कार्ड रद्द कसे होते, जाणून घ्या सर्वकाही

(How to get instant PAN Card if you lost PAN Card get instant pan through new income tax portal)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.