चुकून दुसऱ्याच्या खात्यात रक्कम गेल्यास कशी परत मिळवाल, RBI चे नियम काय?

जर चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर सर्वप्रथम तुमच्या बँकेला फोन किंवा ईमेल द्वारे कळवा. आपण शाखा व्यवस्थापकाला शक्य तितक्या लवकर भेटल्यास चांगले होईल. फक्त ती बँक ही समस्या सोडवू शकते, ज्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले गेलेत. तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर सेंटरला फोन करा आणि त्यांना सर्व काही सांगा.

चुकून दुसऱ्याच्या खात्यात रक्कम गेल्यास कशी परत मिळवाल, RBI चे नियम काय?
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 8:02 AM

नवी दिल्ली : आजकाल डिजिटल पेमेंटवर बराच वेळ भर दिला जातोय. कोरोना संकटाच्यादरम्यान आणि नंतर डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. सध्या डिजिटल वॉलेट्स, NEFT / RTGS, UPI, Google Pay, BHIM अॅप आणि इतर सेवांद्वारे पैशांचे व्यवहार सहजपणे केले जातात. हे सर्व माध्यम पैसे पाठवण्याचा किंवा प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. यामुळे पैसे हस्तांतरित करणे सोपे झालेय, परंतु त्यात चुका होत आहेत. बर्‍याच वेळा जेव्हा पैसे हस्तांतरित करताना बँक खाते क्रमांक चुकून टाईप केला जातो, तेव्हा तो चुकीच्या खात्यात हस्तांतरित होतो.

आपल्या बँकेला त्वरित सूचित करा

जर चुकून दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर सर्वप्रथम तुमच्या बँकेला फोन किंवा ईमेल द्वारे कळवा. आपण शाखा व्यवस्थापकाला शक्य तितक्या लवकर भेटल्यास चांगले होईल. फक्त ती बँक ही समस्या सोडवू शकते, ज्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले गेलेत. तुमच्या बँकेच्या कस्टमर केअर सेंटरला फोन करा आणि त्यांना सर्व काही सांगा. जर बँकेने ई-मेलद्वारे सर्व तपशील विचारला तर व्यवहाराचा संपूर्ण तपशील पाठवा. यामध्ये व्यवहाराची तारीख, वेळ, तुमचा अकाऊंट नंबर, पैसे कुठे पाठवले गेले होते, त्याचा अकाउंट नंबर समाविष्ट केला जाईल.

शाखा व्यवस्थापकाला भेटा

जर तुम्ही ज्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले असतील, खाते क्रमांक चुकीचा असेल किंवा IFSC कोड चुकीचा असेल, तर पैसे आपोआप तुमच्या खात्यात येतील. त्याच वेळी जर तसे नसेल तर आपल्या बँकेत जा आणि शाखा व्यवस्थापकाला भेटा. त्याला या चुकीच्या व्यवहाराची संपूर्ण माहिती द्या. कोणत्या बँक खात्यात पैसे गेले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर चुकून दुसर्‍या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले गेले असतील, तर पैसे परत मिळण्यास जास्त वेळ लागू शकतो. कधी कधी बँका अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी 2 महिने लागू शकतात. तुम्ही तुमच्या बँकेकडून शोधू शकता की, कोणत्या शहराच्या कोणत्या शाखेत पैसे कोणत्या खात्यात हस्तांतरित करण्यात आलेत. तुम्ही त्या शाखेशी बोलून रक्कम काढू शकता.

FIR स्वतः करता येतो

चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित केल्याच्या बहुतेक प्रकरणांमध्ये प्राप्तकर्ता पैसे परत करण्यास तयार असतो. जर त्याने पैसे परत करण्यास नकार दिला, तर तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. आपल्याला अशा प्रकरणांमध्ये आपल्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बँकेत तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करू शकता. आरबीआयने निर्देश दिले आहेत की, जर चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले तर तुमच्या बँकेला त्वरित पावले उचलावी लागतील. चुकीच्या खात्यातून योग्य खात्यात पैसे परत करण्याची व्यवस्था बँकेला करावी लागेल. आजकाल पैसे ट्रान्सफर करताना मोबाईल आणि मेलवर एक मेसेज येतो की, जर व्यवहार चुकीचा असेल तर या फोन नंबरवर मेसेज पाठवा, याद्वारे तुम्ही तक्रारही दाखल करू शकता.

संबंधित बातम्या

विजेचे संकट लवकरच संपेल का?, पूर्व भागातील वीजनिर्मिती 8 टक्क्यांनी वाढली

Bad Bank च्या मंडळात लवकरच अधिक संचालकांचा समावेश, खासगी बँकांमध्ये 49 टक्के हिस्सा

How to get money back by mistake, what are the rules of RBI?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.