गुंतवणुकीवर जास्त व्याज हवेय, मग बँक नव्हे तर ‘हा’ पर्याय निवडा
Interest Rate | अशा परिस्थितीत एक वेगळा पर्याय गुंतवणुकदारांसाठी फायदेशीर ठरु शकतो. मुथूट मिनी कंपनीकडून नॉन कन्व्हर्टिबेल डिबेंचर (NCD) लाँच केले आहेत. यामध्ये गुंतवणुकदारांना जवळपास 10.41 टक्के इतके व्याज मिळत आहे.
मुंबई: गुंतवणुकीचा मुद्दा येतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्याला जास्तीत जास्त परतावा कसा मिळेल किंवा जास्त फायदा मिळवून देणाऱ्या पर्यायांच्या शोधात असतो. अलीकडच्या काळात बँकेतील मुदत ठेव आणि बचत खात्यावरील व्याजदर सार्वकालिक निचांकी पातळीवर पोहोचला आहे. मोठ्या बँकेच्या तुलनेत लहान बँका चांगले व्याज देत असल्या तरी त्याठिकाणी पैसे सुरक्षित राहतील किंवा नाही, याची खात्री गुंतवणुकदारांना नसते. त्यामुळे अगदी 10 टक्क्यांच्या आसपास व्याजदर असूनही गुंतवणुकदार लहान बँकांमध्ये पैसे ठेवायला धजावत नाहीत.
अशा परिस्थितीत एक वेगळा पर्याय गुंतवणुकदारांसाठी फायदेशीर ठरु शकतो. मुथूट मिनी कंपनीकडून नॉन कन्व्हर्टिबेल डिबेंचर (NCD) लाँच केले आहेत. यामध्ये गुंतवणुकदारांना जवळपास 10.41 टक्के इतके व्याज मिळत आहे. तर भारत एटीएमच्या ग्राहकांना 11 टक्के व्याज मिळेल. मुथूट मिनीच्या या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी 9 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.
मुथूट मिनीच्या NCD वर वर्षाला 8.75 टक्के इतके व्याज मिळेल. ही सिक्युअर्ड NCD असून त्यावर प्रत्येक महिन्याला व्याज मिळेल. तुम्ही दोन वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 9 टक्के , 42 महिन्यांसाठी 9.50 टक्के, 50 महिन्यांसाठी 10.22 टक्के इतके व्याज मिळेल.
NCD म्हणजे काय?
NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टिबेल डिबेंचर्स हा आर्थिक गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. कंपनीकडून हे डिबेंचर्स इश्यू केले जातात. या माध्यमातून कंपनी निधी उभारते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एकाच दराने व्याज मिळते. मॅच्युरिटीच्यावेळी तुम्ही गुंतवलेली मुद्दल रक्कम परत मिळते.
इतर बातम्या:
तुमचं नाव बदललं तर क्रेडिट स्कोअरवर होतो परिणाम, कर्ज मिळण्यात अडचणी?
Petrol Diesel Rate Today: अखेर पेट्रोलच्या दरात कपात, डिझेलच्या किंमतीतही घसरण, जाणून घ्या आजचा भाव