Salary Management : पगार नियोजनासाठी वापरा 20/50/30 हे सूत्र, खर्चासह बचतही शक्य
आर्थिक गुतंवणूकदारांच्या मते, जर तुम्हाला खरोखर भविष्यात आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर तुम्ही प्रथम बचत करा. त्यानंतर खर्चाचा विचार करा.

Salary Management मुंबई : प्रत्येकाला त्याच्या भविष्यासाठी बचत करायची असते. पण जेव्हा तुमच्या पगाराची बातमी येते, तेव्हा सर्वात आधी तुमच्यासमोर खर्च उभे राहतात. तुमचे खर्च संपल्यानंतर जर काही पैसे शिल्लक राहिले तर ते गुंतवावे असा विचार समोर येतो. मात्र जर तुमचा संपूर्ण पगार खर्च झाला आणि पैसे शिल्लक राहिले नाहीत, तर मात्र गुंतवणुकीचा पर्याय पुढे ढकलला जातो. (Salary Management Tips and tricks for savings)
आर्थिक गुतंवणूकदारांच्या मते, जर तुम्हाला खरोखर भविष्यात आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर तुम्ही प्रथम बचत करा. त्यानंतर खर्चाचा विचार करा. यात तुम्हाला 20/50/30 हे आर्थिक सूत्र मदत करेल. मात्र हे सूत्र नक्की काय? चला जाणून घेऊया.
?पगाराच्या 20-30 टक्के गुंतवणूक करा
20/50/30 सूत्राच्या पहिल्या भागाअंतर्गत पगाराच्या सर्वात आधी 20-30 टक्के गुंतवणूक करणे हे येते. म्हणजेच या योजनेनुसार तुम्ही सर्वात आधी गुंतवणूक करावी. यामुळे तुम्हाला दीर्घकालीन फायदा होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक मदत मिळेल.
जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादींसाठी तुमच्यासाठी एक चांगला निधी जमा होईल. मात्र जर तुम्ही विवाहित नसाल तरी काही वर्षानंतर तुमच्यासमोर हे खर्च येतील. अशा परिस्थितीत ही 20-30 टक्के बचत तुमच्या कामी येईल. या आर्थिक बचतीसाठी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. यानुसार तुम्ही FD, PF, PPF, म्युच्युअल फंड यासारख्या योजनेत गुंतवणूक करु शकता.
?आपत्कालीन निधीसाठी गुंतवणूक
कोरोना काळात आपत्कालीन निधी किती गरजेचा आहे, याची जाणीव अनेकांना झाली आहे. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली आणि त्यावेळी पैसे नसतील तर तुम्हाला मोठी अडचण येऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपत्कालीन निधी (Emergency Fund) गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आपत्कालीन निधीतील गुंतवणूक ही फार महत्त्वाची असते. यातील पैसे हे आवश्यक असल्यास त्वरित काढता येतात.
मात्र यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे पैसे जमा करण्याची आवश्यकता भासत नाही. यासाठी तुम्ही बचत केलेल्या 20 ते 30 टक्क्यांमधील कमीत कमी 5 टक्के रक्कम तुम्ही आपत्कालीन निधी म्हणून गुंतवा.
?40-50 टक्के पगारात घरगुती खर्च सांभाळा
या सूत्राच्या दुसर्या भागाअंतर्गत घरगुती खर्च येतात. यात स्वयंपाकघरातील खर्च, किराणा सामान, मुलांची फी, पेट्रोल खर्च, मोबाईलचे बिल, घरभाडे, इंटरनेट बिल यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. या खर्चासाठी तुम्ही पगारातील 40-50 टक्के वेगळी काढून ठेवा.
त्याशिवाय प्रत्येक महिन्याची बिलं म्हणजेच क्रेडिट कार्ड बिल, विजेचे बिल, मोबाईल बिल इत्यादी दिलेल्या तारखेपूर्वीच भरुन टाका. यामुळे शेवटच्या क्षणी होणाऱ्या त्रासापासून तुमची मुक्तता होईल. तसेच तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
?विमा, ईएमआय, कर्जासाठी 20-30 टक्के रक्कम
सॅलरी मॅनेजमेंट सूत्राच्या तिसऱ्या भागातंर्गत विमा, ईएमआय, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज यासारख्या निधींचा समावेश करा. यात तुम्ही पगाराच्या 20-30 टक्के रक्कम वेगळी काढा. यामुळे तुम्हाला ईएमआयसाठी निधी उभारण्याच्या तणावातून मुक्तता मिळेल आणि EMI वजा होतेवेळी तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे उपलब्ध असतील. तसेच जर तुमचा EMI वेळेवर कापला गेला तर तुमचा टॅक्सही वाचेल.
?वयानुसार आर्थिक नियोजन
प्रत्येकानला त्याच्या वयानुसार आर्थिक नियोजन देखील करता येते. याचा अर्थ तुम्हाला कोणत्या वयात किती पैसे आवश्यक असतील हे लक्षात घेऊनच नियोजन करा. यामुळे तुमच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात तुम्हाला आवश्यक असणारा निश्चित निधी उपलब्ध होईल. म्हणजे तुमच्या लग्नाच्या वयात लग्नासाठी निधी, मुलांच्या शिक्षणाच्या वेळी शिक्षणासाठीचा निधी, निवृत्तीनंतर निवृत्तीसाठीचा निधीची तुमच्याकडे आधीच तरतूद असेल.
Business Idea | दर महिना 70 हजारांहून अधिक कमाई करायची, मग लवकर सुरु करा ‘हा’ बिझनेस, सरकारकडून 70 टक्के कर्जhttps://t.co/hBOqFCVP2D #businesses #PMMudraloan
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 12, 2021
(Salary Management Tips and tricks for savings)
संबंधित बातम्या :
स्मार्टफोनमध्ये नक्की ठेवा ‘हे’ ॲप्स, पैशांशी निगडीत काम होतील एका क्लिकमध्ये
Investment tips : 5 वर्षात रक्कम डबल, SIP सुरु करण्यासाठी 5 चांगल्या योजना