Jobs Change | मीसुद्धा बदलली नोकरी, संधीची संधी चोहीकडे, आयटी क्षेत्रात 50 हजार जणांना लॉटरी!

Jobs Change | कोरोनाचे मळभ हटले आहे. प्रत्येक क्षेत्रात आता तेजीचे वारे वाहत आहे. मध्यंतरी रोजगाराच्या विवंचनेत काढलेल्या रिकाम्या हातांना जॉब तर मिळालेच. पण नोकरी बदलणाऱ्यांचे प्रमाण ही प्रचंड वाढले आहे. कालाय तस्मै नमः म्हणतात ते उगीच नाही!

Jobs Change | मीसुद्धा बदलली नोकरी, संधीची संधी चोहीकडे, आयटी क्षेत्रात 50 हजार जणांना लॉटरी!
नोकरी बदललीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 3:25 PM

Jobs Change | कोरोनाचे (Corona) मळभ हटले आहे. प्रत्येक क्षेत्रात आता तेजीचे वारे वाहत आहे. मध्यंतरी रोजगाराच्या (Vacancy) विवंचनेत काढलेल्या रिकाम्या हातांना जॉब (Jobs) तर मिळालेच. पण नोकरी बदलणाऱ्यांचे प्रमाण ही प्रचंड वाढले आहे. कालाय तस्मै नमः म्हणतात ते उगीच नाही! आता सहज जॉब स्वीच करणाऱ्यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक आहे. कोरोना काळात आहे तीच नोकरी टिकवणं महत्वाचं वाटत होतं. कंपन्यांनी जादा वर्कलोड देऊनही अनेकांनी मनावर दगड ठेऊन नोकऱ्या टिकवल्या. आता चित्र पालटलं आहे. प्रत्येक क्षेत्राचा झपाटा वाढला आहे. नवीन ऑर्डर, उत्पादनात वाढ आणि कुशल मनुष्यबळासाठी प्रसंगी जादा किंमत मोजण्याची तयारी कंपन्यांनी केली आहे. परिणाम अचूक दिसत आहे. ‘अरे, मीसुद्धा नोकरी बदलली’, (Jobs Change) असं वट न सांगणारे भिडू प्रत्येक क्षेत्रात दिसू लागले आहेत. कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळतंय तर कॅलिबरला नवीन नोकरी.

आयटी सेक्टरमध्ये सर्वाधिक बदल

देशातील आयटी सेक्टरसध्या बुमिंग आहे.नवीन कामाच्या ऑर्डर्स मिळाल्याने या क्षेत्रात उत्साह संचारला आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून विदेशात नोकरी मिळवणाऱ्यांचे स्वप्न अनेकजण उराशी बाळगून होते. अशा अनेकांची स्वप्ने आता साकार होत आहे. कंपन्या त्यांना प्रकल्पावर कामासाठी बाहेर देशात पाठवण्यात येत आहे. तर देशातंर्गत आयटी पार्कमध्ये कंपन्या बदलण्याचे आणि जॉब शिफ्टचे प्रकारही वाढले आहेत. एकट्या आयटी सेक्टरने 50 हजार नव्या कर्मचाऱ्यांना जॉब दिला आहे. तर अनेकांनी नोकरी बदलली आहे. कामाचा ताण वाढला असला तरी घामाला उमदा दाम मिळत असल्याने कर्मचारी खुश आहेत.

खेचाखेची सुरु

अनेक तगड्या कंपन्या दुसऱ्या कंपन्यातील जय-वीरुला आकर्षक पॅकेज देऊन पळवत आहेत. ही पळवापळवी सर्वच सेक्टरमध्ये सुरु आहे. वेगाने पुढे जाण्याच्या शर्यतीत कंपन्यांना अनुभवी, ताज्या दमाचे सहकारी हवे आहेत. त्यामुळे जॉब बदलाचे वारे जोमात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, येत्या 5 वर्षांत एकटे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रच 60 लाख नवीन नोकऱ्या देईल. तर कंजूस व्यवस्थापनासाठी आगामी काळ आव्हानात्मक असणार आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन कंपन्यांची लाट

देशात नवीन उद्योगांची मुहूर्तमेढ जोमात सुरु आहे. या वर्षात, 2022 मध्ये सुरुवातीच्या सहा महिन्यांत जवळपास 1 लाख नवीन कंपन्यांची स्थापना झाली आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाकडे ही नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 14 टक्क्यांनी वाढला आहे. पण त्या तुलनेत कंपन्यांना टाळे लागण्याचे प्रमाण जास्त आहे. देशभरात यंदा 59,560 कंपन्यांचे शटर डाऊन झाले आहे. देशात 14.1 लाख खासगी कंपन्या कार्यरत आहेत.

या राज्यांत सर्वाधिक कंपन्या

सर्वाधिक रोजगार आणि उद्योग अर्थात महाराष्ट्रच देतो, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात 2.80 लाख उद्योग आहेत. त्याखालोखाल नवी दिल्लीत 2.40 लाख, प.बंगालमध्ये 1. 33 लाख, उत्तर प्रदेशमध्ये 1.11 लाख, कर्नाटकात 1.11 लाख, त्यानंतर गुजरात, तामिळनाडू, राजस्थान आणि इतर राज्यांचा क्रमांक लागतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.