तू नभातले तारे माळलेस ना तेव्हा… पहिल्या प्रेमाबद्दल रतन टाटा झाले हळवे

Ratan Tata | . प्रत्येकाच्या मनातील हळव्या कोपऱ्यात कोणीतरी असतेच. एकतरी आवडती व्यक्ती तिथे असतेच. उद्योगपती रतन टाटा यांची प्रेम कहाणी कधीच पुढे गेली नाही. चार वेळा त्यांच्या प्रेमाची रेल्वे काही पुढे सरकलीच नाही. या उमद्या मनाच्या, मृदू स्वभावाच्या व्यक्तीच्या आयुष्यातही प्रेमाची पहाट उगवली. पण हे प्रेम त्याच्या शेवटाला कधीच पोहचू शकले नाही.

तू नभातले तारे माळलेस ना तेव्हा... पहिल्या प्रेमाबद्दल रतन टाटा झाले हळवे
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 2:12 PM

नवी दिल्ली | 28 डिसेंबर 2023 : टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्याविषयी प्रत्येकाला आदर आहे. ते तर अनेकांचे रिअल हिरो आहेत. रतन टाटा हे त्यांच्या अनेक कामांमुले सतत चर्चेत असतात. त्यांचे फॅन फॉलोवर्स खूप आहेत. त्यांची यशोगाथा आपण वाचली आहे. पण एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रेमाविषयी मन मोकळे केले. Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मनाचा हळवा कोपरा मोकळा केला. ‘अशी कोणी पुन्हा भेटलीच नाही, जिला पत्नी म्हणू शकू’ अशा शब्दात त्यांनी मनातील एका कोपऱ्यातील दडवून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. रतन टाटा यांनी त्यांच्या 4 प्रेम कथाविषयी सांगितले आहे. पण पहिल्यांदाच त्यांनी लग्नाविषयी काहीतरी सांगितले.

युद्धाने केला प्रेमाचा अंत

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी त्यांच्या प्रेम प्रकरणावरील पडदा हटवला. रतन टाटा हे एका कंपनीत काम करत असताना लॉस एंजेलिसमध्ये प्रेमात पडले होते. 1962 मधील भारत-चीन युद्धामुळे या प्रेमकहाणीला ब्रेक लागला. या नात्याविषयी रतन टाटा गंभीर होते. त्यांना त्या मुलीशी लग्नही करायचे होते. पण नंतर त्यांना भारतात परतावे लागले. काही कारणास्तव त्यांची मैत्रिण काही भारतात येऊ शकली नाही. पुढे युद्धाची माशी शिंकली आणि लग्नाला परवानगी मिळाली नाही. हे प्रेम प्रकरण तिथेच संपले. रतन टाटा यांचे नाव सिमी ग्रेवाल यांच्यासोबतही जोडल्या गेले. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही.

हे सुद्धा वाचा

लग्न न झाल्याची रुखरुख?

अमेरिकेतील प्रेमकथा संपल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अजून कोणीतरी आले. पण त्यांना पत्नी म्हणू शकू, असा काही हा मामला नव्हता, असे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. त्यानंतर आयुष्यात व्यवसायानिमित्त अनेक चढउतार आले. व्यवसायाच्या निमित्ताने अनेक शहरात प्रवास सुरु झाला. त्यामुळे लग्न अथवा इतर गोष्टीत कधी मन रुळले नाही. आज इतक्या वर्षानंतर त्याविषयी विचार केला तर एक सेकंद पण आपल्याला दुःख होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

तू नभातले तारे माळलेस ना, तेव्हा

रतन टाटा यांच्या आई-वडिलांचा संसार चांगला सुरु होता. पण काहीतरी खटपट झाल्याचे निमित्त आणि दोघांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. ते लॉस एंजेलिस येथे शिक्षणाला पोहचले. तो काळ भारलेला होता. निसर्ग संगतीला होता. उराशी अनंत ध्येय होती आणि एक चेहरा मनात होता, असा तो काळ होता. त्याचवेळी ही नजरेची चुकामूक झाली होती. गोष्ट लग्नापर्यंत येऊन ठेपली होती. पण ते प्रेमप्रकरण तिथेच थांबले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.