ICC WC 2023 : क्रिकेटचा तर आताच चढला ज्वर! गुजरातमधील हॉटेल चालकांची चंगळ

ICC WC 2023 : क्रिकेटचा ज्वर आतापासूनच चढला आहे. आयसीसी विश्वचषकाचे (ICC Cricket World Cup 2023) वादळ यायला आणखी 100 दिवस बाकी आहे. पण त्याचे परिणाम आतापासूनच दिसत आहेत. गुजरातमधील हॉटेल चालक आतापासूनच मालामाल झाले आहेत.

ICC WC 2023 : क्रिकेटचा तर आताच चढला ज्वर! गुजरातमधील हॉटेल चालकांची चंगळ
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 5:41 PM

नवी दिल्ली : भारतात क्रिकेट हा श्वास आहे, तर काहींचा धर्म आहे. किक्रेट हेच त्यांचे जीवन आहे, नव्हे रोजचे जगणे आहे. आता भारतात आयसीसी विश्वचषकाचे (ICC Cricket World Cup 2023) आगमन होत आहे. हे वादळ यायला अजून जवळपास 100 दिवस बाकी आहेत. पण त्याचे परिणाम आताच दिसायला सुरुवात झाली आहे. अंतिम सामन्यापेक्षा पण भारत आणि पाकिस्तानमधील सामना दोन्ही देशांसाठी करो या मरोचा सामना असतो. हा सामना गुजरातमधील अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. त्यापूर्वीच येथील हॉटेल व्यावसायिक (Hotel) मालामाल झाले आहेत. त्यांच्यावर आतापासूनच लक्ष्मी प्रसन्न झाली आहे.

असा झाला फायदा नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सलामीचा सामना, अंतिम सामना यासोबतच हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामना खेळण्यात येणार आहे. अजून 100 दिवसांनी हा कुंभमेळा रंगणार आहे. देशावर क्रिकेटचा फिवर चढायला सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील जवळपास 80 टक्के हॉटेल आतापासूनच बुक झाले आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटप्रेमींचा हिरमोड होणार आहे. त्यांना सामना पाहुन थेट घराकडे निघावे लागेल. सामन्यासाठी वेळेच्या आधी स्टेडियमवर पोहचावे लागेल.

इतके जास्त भाडे अहमदाबाद येथील अनेक हॉटेल्स सध्या बुक झाल्या आहेत. तर काही हॉटेल्समध्ये कमी रुम उरल्या आहेत. या रुमचे भाडे ऐकून तर तुमचा विश्वासच बसणार नाही. 100 दिवसांपूर्वीच या रुम्सचे भाडे 50 हजार ते एक लाख रुपयांच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे यापुढे किती भाडे वाढणार याचा अंदाज या आकडेवारीवरुन समोर येईल. तसेच त्यावेळी हॉटेलही उपलब्ध नसतील, तर काय व्यवस्था असेल असे प्रश्न समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

अहमदाबादमध्ये तीन सामने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होण्यापूर्वीच अहमदाबादमध्ये मोठी उलाढाल सुरु आहे. येथील हॉटेल्सनी अगोदरच फिरकी टाकली आहे. त्यांचा स्कोअर वाढला आहे. इंडस्ट्री सूत्रांनुसार, साडे तीन महिन्यापूर्वी बुकिंग वर काही श्रेणीतील रुम्सचे भाडे 50,000 रुपयांपर्यंत पोहचले आहे. सामने जाहीर होण्यापूर्वी या रुम्सचे भाडे 6,500-10,500 रुपयादरम्यान होते. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजीत करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सलामीचा सामना, अंतिम सामना यासोबतच हायहोल्टेज भारत-पाकिस्तान सामना खेळण्यात येणार आहे.

भारत-पाक सामन्यापूर्वीच बुकिंग भारत-पाकिस्तानचे संघ 15 ऑक्टोबर रोजी भिडतील. विजयश्री खेचून आणण्यासाठी दोन्ही संघात चुरस असणार आहे. ही चुरस क्रिकेटच्या मैदानावरच नाही तर बाहेर पण असते. या सामन्यासाठी खच्चून गर्दी असेल. तसेच टीव्हीवर, ऑनलाईन सर्व प्लॅटफॉर्मवर या सामन्यासाठीची उत्सुकता कायम असते. या सामन्यासाठी 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान बुकिंग आतापासूनच सुरु झाले असून मोठ्या प्रमाणात रुम बुक झाल्या आहेत. अनेक नामांकित, गल्ली बोळातील हॉटेल्सच्या 60-90 टक्के रुम बुक झाल्या आहेत.

येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.