World Cup 2023 | विश्वचषकाचा अंतिम सामन्याचा अनुभवा थरार, हॉटेलसह विमानाचे भाडे झाले फार
World Cup 2023 | भारताने बुधवारी वानखेडे मैदानावर उपांत्यपूर्व सामान्यात न्यूझीलंडला 70 धावांनी मात दिली. विश्वकपाचा भारत प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. हा सामना याची देहि, याची डोळा पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांनी अहमदाबादकडे कूच केली आहे. पण अहमदाबादमधील अनेक हॉटेल्स बुक झाल्या आहेत. तर काहींचे भाडे गगनाला भिडले आहे.
नवी दिल्ली | 17 नोव्हेंबर 2023 : ICC World Cup 2023 चा अखेरचा सामना अहमदाबादमध्ये होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियात हा सामना रंगेल. या सामन्याची उत्कंठा देशभर आहे. हा सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षकांनी अगोदरच तिकीटांची खरेदी केली आहे. तर काही जणांना अहमदाबाद येथे जाऊन हा रोमांच अनुभवयचा आहे. पण या ऐतिहासिक क्षणासाठी प्रेक्षकांना इतर दिव्याचा सामना करावा लागणार आहे. विमानाचे तिकीट, रेल्वेचे तिकीट मिळवणे सोपे राहिले नाही. साध्या हॉटेलचे एका रात्रीसाठीचे भाडेच 10,000 रुपयांच्या घरात आहे. तर आलिशान हॉटेलमध्ये त्यासाठी प्रेक्षकांना जवळपास 1 लाख रुपयांचा खर्च मोजावा लागणार आहे.
फ्लाईट तिकिट 200% ते 300% पर्यंत महाग
विमानाच्या तिकिटाचे दर तर गगनाला भिडले आहेत. अहमदाबादसाठीच्या विमानाच्या दरात 200-300% वाढ झाली आहे. अंतिम सामन्यासाठी दिल्लीहून अहमदाबादाकडे जाणाऱ्या विमानाचे भाडे 15,000 रुपये आहे. अहमदाबाद येथे राहण्याची व्यवस्था आणि तिथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक दिव्य करावे लागत आहे. फ्लाईट तिकीट 15,000 रुपये आहे. या सामन्यासाठी होणारी गर्दी पाहता सर्वच वस्तूच्या किंमती वाढल्याचे दिसून येत आहे.
प्रवास आणि राहण्याची व्यवस्था महाग
या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादला जाणे सोपे नाही. फ्लाईट तिकीट महागले आहे. विमान प्रवासाचे तिकीटाचे दर वाढले आहेत. यापूर्वी 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी हाच अनुभव आला होता. हॉटेलचा टेरिफ प्लॅन वाढला आहे. बुकिंगडॉटकॉम, मेकमायट्रिप,एगोडा यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक सर्च होत आहे. हॉटेल्समध्ये राहण्यासाठी सर्वाधिक सर्च करण्यात येत आहे.
तिकिटांची जोरदार विक्री
या अंतिम सामन्यांसाठी तिकीटांची अंतिम बॅच, 13 नोव्हेंबरपासून विक्रीला सुरुवात झाली आहे. तिकिटांची जोरदार विक्री झाली आहे. BookMyShow वर उपलब्ध सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत 10,000 रुपये होती. भारताने बुधवारी वानखेडे मैदानावर उपांत्यपूर्व सामान्यात न्यूझीलंडला 70 धावांनी मात दिली. विश्वकपाचा भारत प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. हा सामना याची देहि, याची डोळा पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांनी अहमदाबादकडे कूच केली आहे. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना आता जास्त पैसा मोजावा लागणार आहे.