World Cup 2023 | विश्वकपवर भारताने उमटवली मोहर तर युझर्सला 100 कोटी, या सीईओचं पक्कं प्रॉमिस

World Cup 2023 | भारताने यंदाच्या विश्वचषकात कमाल केली तर युझर्स मालामाल होतील. कारण पण तसेच आहे. विश्वचषकावर भारताने नाव कोरले, भारत जिंकला तर या कंपनीच्या युझर्सला 100 कोटींची लॉटरी लागणार आहे. या कंपनीच्या सीईओने हे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चाहत्यांनी देवा पाण्यात ठेवले आहे.

World Cup 2023 | विश्वकपवर भारताने उमटवली मोहर तर युझर्सला 100 कोटी, या सीईओचं पक्कं प्रॉमिस
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 4:15 PM

नवी दिल्ली | 19 नोव्हेंबर 2023 : विश्वचषकासाठी आज, रविवार, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियात काटे की टक्कर सुरु आहे. ICC Cricket World Cup 2023 चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये रंगला आहे. भारताची सुरुवात पडझडीने झाली. त्यामुळे प्रेक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. देशासह परदेशातील क्रिकेट चाहते या कुंभमेळ्याची वाट पाहत होते. या सामन्यात प्रेक्षकांना कमाईची मोठी संधी आहे. भारताने यंदा विश्वचषकावर नाव कोरले तर या कंपनीच्या युझर्सला 100 कोटींची लॉटरी लागणार आहे. भारत जर जिंकला तर ग्राहकांच्या वॉलेटमध्ये 100 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहे. कोणाला लागणार ही लॉटरी?

Astrotalk CEO चा दावा काय?

Astrotalk CEO पुनीत गुप्ता यांनी LinkedIn वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी हा दावा केला आहे. त्यांनी ही भावनिक पोस्ट केली आहे. त्यात त्याने भावनिक साद घातली आहे. त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भारताने 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी गुप्ता हे कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी चंदीगड कॉलेजजवळील ऑडिटोरियममध्ये त्याने हा सामना पाहिला होता. या सामन्यामुळे अदल्या रात्री झोप सुद्धा लागली नसल्याचे त्याने सांगितले. सामन्याचा दिवस अत्यंत खास असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

पुनीत गुप्ताने केला भांगडा

देशातील टॉप एस्ट्रोलॉजी एप Astrotalk चे सीईओ पुनीत गुप्ता यांनी 2011 मध्ये भारताने विश्वचषक जिंकल्यावर आनंद व्यक्त केला होता. तो दिवस आजही त्यांना लख्ख आठवतो. त्यांनी सर्व मित्रांची गळाभेट घेतली. चंदीगड शहरातून ते बाईकवरुन फिरले आणि त्यांनी अनोळखी लोकांसोबत भांगडा पण केला, अशी माहिती त्यांनी दिली.

आता लोकांमध्ये वाटणार आनंद

गुप्ता यांनी पोस्टमध्ये लिहिले की, भारताने या विश्वचषकावर मोहर उमटवली तर हा मोठा विजय ठरेल. हा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. हा आनंद मित्र, कुटुंबासोबत साजर करु. पण Astrotalk च्या ग्राहकांसोबत हा आनंद साजरा करण्याची संधी सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताने हा सामना जिंकला तर Astrotalk च्या ग्राहकांच्या वॉलेटमध्ये 100 कोटी जमा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आज भारताच्या विजयाची प्रार्थना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.