IDFC फर्स्ट बँकेसह तीन बँकांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर, वाचा तपशील
जुलै-सप्टेंबर 2021 या तिमाहीत IDFC फर्स्ट बँकेचे व्याज उत्पन्न वाढून 4,100.58 कोटी रुपये झाले. आर्थिक वर्ष 2020-21 च्या याच कालावधीत व्याज उत्पन्न 3,924.86 कोटी रुपये होते. याशिवाय, बुडीत कर्जे (एनपीए) वाढल्यामुळे दुस-या तिमाहीत बँकेच्या बुडीत कर्जे आणि इतर खर्चासाठी तरतूद वाढून 474.95 कोटी रुपये झाली आहे.
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील IDFC फर्स्ट बँकेचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसर्या तिमाहीत स्टँडअलोन आधारावर 50 टक्क्यांनी वाढून 151.74 कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत बँकेचा निव्वळ नफा 101.41 कोटी होता. एप्रिल-जून 2021 या तिमाहीत बँकेला एकूण 630 कोटी रुपयांचा तोटा झाला. बँकेने म्हटले आहे की, जुलै-सप्टेंबर 2021 या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न वाढून 4,880.29 कोटी रुपये झाले. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 4,090.87 कोटी रुपये होता.
IDFC चा NPA वाढला
जुलै-सप्टेंबर 2021 या तिमाहीत IDFC फर्स्ट बँकेचे व्याज उत्पन्न वाढून 4,100.58 कोटी रुपये झाले. आर्थिक वर्ष 2020-21 च्या याच कालावधीत व्याज उत्पन्न 3,924.86 कोटी रुपये होते. याशिवाय, बुडीत कर्जे (एनपीए) वाढल्यामुळे दुस-या तिमाहीत बँकेच्या बुडीत कर्जे आणि इतर खर्चासाठी तरतूद वाढून 474.95 कोटी रुपये झाली आहे. त्याच वेळी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत खासगी क्षेत्रातील DCB बँकेचा निव्वळ नफा 21 टक्क्यांनी घसरून 64.94 कोटी रुपयांवर आला. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 82.29 कोटी रुपये होता.
DCB बँकेच्या कमाईत वाढ
DCB बँकेने सांगितले की, जुलै-सप्टेंबर 2021 या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न वाढून 967 कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 959.33 कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचे व्याजातून मिळणारे उत्पन्न 869.27 कोटी रुपयांवर घसरले. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत तो 878.45 कोटी रुपये होता.
Equitas SFB नफा कमी झाला
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, DCB बँकेचे बुडीत कर्ज देखील 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत 4.68 टक्क्यांपर्यंत वाढले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2.27 टक्के होते. याशिवाय चेन्नईच्या Equitas Small Finance Bank (Equitas SFB) ने 30 सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 41 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेला 103 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
संबंधित बातम्या
अटल पेन्शन सुरू करण्याचा सर्वात सोपा मार्ग; आधार e-KYC सह ऑनलाईन खाते उघडा अन् घरबसल्या कमवा
मोदी सरकारचा मोठा उपक्रम! महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी खास योजना, एक लाखापर्यंत कमाई
IDFC First Bank announces second quarter results of three banks read details