IDFC First Bank ने मुदत ठेवीवरील व्याज दर बदलले, फटाफट वाचा नवे दर

1 मेपासून IDFC फर्स्ट बँकेने त्यांच्या बचत खात्यांवरील व्याज दर कमी केले आहेत आणि मुदत ठेवीवरील व्याज दर बदलेले आहेत. IDFC First Bank

IDFC First Bank ने मुदत ठेवीवरील व्याज दर बदलले, फटाफट वाचा नवे दर
IDFC First Bank
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 11:19 AM

नवी दिल्ली: खासगी क्षेत्रातील नामाकिंत बँक आयडीएफसी फर्स्ट बँकेने (IDFC First Bank) त्यांच्याकडील बचत आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजदरांबाबत मोठा निर्णय लघेतला आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने 1 मे 2021 पासून त्यांच्याकडील मुदत ठेव खात्यांवरील व्याज दर बदलले आहेत. आयडीएफसी फर्स्ट बँक त्यांच्या ग्राहकांना 1 वर्ष ते 10 वर्ष कालावधीपर्यंतच्या मुदत ठेवी ठेवण्याची सुविधा देते. 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर बँक 2.75 टक्के ते 6 टक्केपर्यंत व्याज देते. दुसरीकडे बँकेने बचत खात्यावरील व्याजदर कमी केले आहेत. (IDFC First Bank changed fixed deposit and Savings Account interest rates check Latest new rates here)

व्याज दर कसे बदलले?

आयडीएफसी फर्स्ट बँकेने व्याज दर बदलताना 7 ते 14 दिवसांच्या कालावधी साठी 2.75 टक्के व्याज देण्याची घोषणा केलीय. 15 ते 29 दिवस आणि 30 ते 45 दिवसांच्या कालावधीसाठी 3 टक्के आणि 3.5 टक्के व्याज देण्यात येईल. 45 ते 90 दिवसांसाठी 4 टक्के, 91 ते 180 दिवसांसाठी 4.5 टक्के आणि 181 दिवस ते 365 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी 5.25 टक्के व्याज मिळेल.

सर्वाधिक व्याज दर किती?

1 ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी 5.50 टक्के, 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीसाठी 5.75 टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे आयडीएफसी फर्स्ट बँक 3 वर्ष ते 5 वर्षांच्या काळासाठी 6 टक्के व्याज देतेय. तर 5 वर्ष ते 10 वर्षांच्या काळासाठी मुदत ठेवीवर 5.75 टक्के व्याज मिळेल.

1 मे पासून जारी करण्यात आलेले नवे दर

7 – 14 दिवस- 2.75%

15 – 29 दिवस- 3.00%

30 – 45 दिवस- 3.50%

46 – 90 दिवस- 4.00%

91 – 180 दिवस- 4.50%

181 दिवस-आणि 1 वर्षापेक्षा कमी- 5.25%

1 वर्ष – 2 वर्ष- 5.50%

2 वर्ष 1 दिवस – 3 वर्ष- 5.75%

3 वर्ष 1 दिवस – 5 वर्ष – 6.00%

5 वर्ष 1 दिवस – 10 वर्ष – 5.75%

5 वर्ष (करबचत )- 5.75%

बचत खात्यावरील व्याजदर घटवले

आयडीएफसी फर्स्ट बँकेने त्यांच्याकडील बचत खात्यावरील व्याज दर घटवले आहेत. 1 लाख रुपयांपेक्षा कमी व्याजदर असलेल्या खात्यांवर 4 टक्के व्याज दिलं जाईल. दुसरीकडे 1 लाख रुपयांपासून 10 लाखापर्यंतची रक्कम खात्यावर ठेवणाऱ्यांसाठी 4.5 टक्के व्याज मिळेल. 10 लाख ते 2 कोटी रुपये कायम ठेवणाऱ्या खातेधारकारांना 5 टक्के व्याज मिळेल.

संबंधित बातम्या:

‘या’ बँकेचं ग्राहकांना मोठं गिफ्ट; आता बचत खात्यावरही मिळणार 7 टक्के व्याज

पोस्टात फक्त 500 रुपयांत खातं उघडा; ‘या’ तीन योजनांमध्ये बँकेपेक्षा जबरदस्त फायदा

(IDFC First Bank changed fixed deposit and Savings Account interest rates check Latest new rates here)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.