Income Tax : तुम्ही देखील ही चूक केली तर तुम्हाला येऊ शकते इनकम टॅक्सची नोटीस
Income Tax Notice : कोणताही पैशांच्या व्यवहार करताना नियमानुसारच केली पाहिजे. अनेकांना हे नियम माहित नसतात त्यामुळे ते चूक करतात. ज्यामुळे मग आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. जर तुम्हाला ही गोष्ट टाळायची असेल तर तुम्ही कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे जाणून घ्या.
Income Tax : आयकर विभागाकडून नोटीस येऊ नये म्हणून लोकं विविध उपाय करतात. पण तरीही काहीना काही चूक होऊनचे जाते. आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रान्झॅक्शन नियमांबद्दल सांगणार आहोत, जे लक्षात ठेवून तुम्ही आयकर विभागाच्या नोटीसपासून दूर राहू शकता.
तुम्ही किती रोख जमा करू शकता?
अनेकांना असे वाटते की ते त्यांच्या बँक खात्यात कितीही रक्कम जमा करू शकतात. पंरतू तसे नसते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) च्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम बँकेत जमा केली तर त्याची माहिती त्यांनी आयकर विभागाला द्यावी लागते.
तुम्ही वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये पैसे टाकले तरी देखील ते तुमच्या नावावरच दिसते. त्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जर तुम्ही तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करत असाल तर तुम्हाला आयकर विभाग याबाबत माहिती विचारु शकते. हा पैसा बेकायदेशीरपणे कमावला आहे की नाही याबाबत ही विचारणा केली जाते.
मोठी मालमत्ता खरेदी करताना काळजी घ्या
प्रॉपर्टी खरेदी करताना सगळेच जण मोठा व्यवहार करतात. याबाबत ही आयकर विभाग तुम्हाला विचारणा करु शकते. जर तुम्ही 30 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा रोख व्यवहार केला असेल तर मालमत्ता निबंधक ही माहिती आयकर विभागाला देते. अशा परिस्थितीत आयकर विभाग पैशाच्या स्रोताबाबत तुम्हाला विचारणा करु शकते. हे टाळण्यासाठी तुम्ही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
गुंतवणुकीवरही लक्ष ठेवा
सध्या तुम्ही जर शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही शेअर बाजार आणि MF तसेच डिबेंचर्स किंवा बाँड्स खरेदीसाठी 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिकचे व्यवहार केले असतील, तरी देखील ती माहिती प्राप्तिकर विभागाकडून प्राप्त होते. त्यामुळे तुम्हाला आयकर विभाग एवढी मोठी रक्कम कुठून आली याची विचारणा करु शकते.
क्रेडिट कार्ड बिलावरही प्रश्न
जर तुम्ही क्रेडिट कार्ड जास्त प्रमाणात वापरत असाल आणि त्यानंतर 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम रोख भरत असाल तर तुम्हाला याबाबत विचारणा होऊ शकते. तुम्ही बिल पेमेंट रोखीने केल्यास, तुम्हाला पैशाच्या स्रोताबद्दल विचारले जाऊ शकते. कोणत्याही आर्थिक वर्षात 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे पेमेंट कोणत्याही प्रकारे केले असले तरी, पैशाच्या स्रोताबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात.