1 महिन्यापासून नोकरी नसेल तर पीएफचे हे पैसे उपयोगी येतील, किती पैसे काढता येणार?

ज्या लोकांना नोकरीबाबत अडचण येऊन आर्थिक संकट आलंय त्यांना या काळात पीएफची मदत होऊ शकते.

1 महिन्यापासून नोकरी नसेल तर पीएफचे हे पैसे उपयोगी येतील, किती पैसे काढता येणार?
ईपीएफओ
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 6:30 AM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झालाय. हा परिणाम आर्थिक पातळीवरही दिसलाय. कुणाचे पगार कमी झालेत, तर कुणाची नोकरीच गेलीय. अशात ज्या लोकांना नोकरीबाबत अडचण येऊन आर्थिक संकट आलंय त्यांना या काळात पीएफची मदत होऊ शकते. नोकरी गेलेले लोक आपल्या पीएफ अकाऊंटमधून काही प्रमाणात पैसे काढू शकतात. ईपीएफओकडून आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिलीय (If you loose your job then can use your EPF refundable advance).

ईपीएफचं खातं असलेले सदस्य बेरोजगार असताना नॉन रिफंडेबल अॅडव्हान्सचे पैसे वापरु शकतात. म्हणजेच त्यांना पीएफ खात्यावरुन पैसे वापरता येतील. विशेष म्हणजे हे पैसे कर्जाप्रमाणे परत करण्याचीही गरज नाही.

किती पैसे काढू शकतात?

पीएफ खातेधारक आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी 75 टक्के पैसे काढू शकतात. ते नॉन रिफंडेबल असतील. ईपीएफओने या माध्यमातून बेरोजगारांना मदत करण्याचा आणि सोबतच त्यांचं पीएफ सदस्यत्व सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

लवकरच चांगली बातमी?

पुढील महिन्यापर्यंत कर्मचारी भविष्‍य निधी संघटना (EPFO) जवळपास 6 कोटीहून अधिक सदस्यांना चांगली बातमी देऊ शकते. जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत EPFO आपल्या खातेधारकांच्या खात्यावर 8.5 टक्के दराने व्याज देणार आहे. EPFO च्या केंद्रीय मंडळाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच व्याज देण्याची घोषणा केली होती. ईपीएफओचे 6 कोटी सदस्य आहेत. त्यांना आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.5 टक्के व्याज मिळेल. मागील 8 वर्षातील हे सर्वात कमी व्याजदर आहे.

आधार लिंक करणं आवश्यक

ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत ईपीएफ अकाउंट आधारशी लिंक केलेलं नाही त्यांना लवकर हे करावं लागेल. अन्यथा पीएफ खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी देखील अडचण येऊ शकते. इतकंच नाही तर आधार लिंक नसेल तर पीएफ खातेधारकाचा ECR देखील दाखल होणार नाही.

हेही वाचा :

Alert | नोकरदारांनो लक्ष द्या! EPFOमध्ये ‘ही’ कागदपत्र जमा करणे आवश्यक, अन्यथा व्याजाला मुकाल!

EPF वर होणाऱ्या कमाईवर टॅक्स कॅल्क्युलेशन कसं होणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं

नोकरीवर असताना EPF मधून पैसे काढायचे आहेत? मग जाणून घ्या इत्यंभूत माहिती

व्हिडीओ पाहा :

If you loose your job then can use your EPF refundable advance

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.