IKIO IPO : आयपीओची दमदार एंट्री, गुंतवणूकदारांची आता कमाईच कमाई

KIO IPO : आयकियोच्या लाईटिंगच्या आयपीओने शेअर बाजारात जोरदार मुसंडी मारली. या आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांना लॉटरी लागली. आता शेअर बाजारात हा शेअर काय कमाल दाखवतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

IKIO IPO : आयपीओची दमदार एंट्री, गुंतवणूकदारांची आता कमाईच कमाई
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 7:15 PM

नवी दिल्ली : आयकियोच्या लाईटिंग कंपनीच्या आयपीओने (IKEO Lighting’s IPO ) आज शेअर बाजारात जोरदार मुसंडी मारली. हा आयपीओ आज सूचीबद्ध झाला. दमदार कामगिरी करत आयपीओने गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला. हा शेअर, बाजारात सुचीबद्ध होताच, त्याने जवळपास 37 टक्क्यांची भरारी घेतली. गुंतवणूकदारांना मालामाल केले. आयकियो लाईटिंगने काही दिवसांपूर्वी 607 कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला होता. या आयपीओचा जवळपास 68 पट पैसा वसूल झाला होता. रात्रीतूनच काही गुंतवणूकदार लखपती आणि करोडपती झाले होते. त्यावेळीच हा आयपीओ पण कमाल करेल असे वाटत होते.

अशी झाली एंट्री आज सकाळी आईकियोचा लाईटिंग शेअर जवळपास 391 रुपयांच्या स्तरावर सूचीबद्ध झाला. कंपनीने आयपीओ दरम्यान गुंतवणूकदारांना 285 रुपये प्रति शेअरचा दर जाहीर केला होता. यामुळे गुंतवणूकदारांना प्रति शेअर आज जवळपास 106 रुपयांचा फायदा झाला. आयकियो लाईटिंगचा शेअरने दमदार कामगिरी दाखवली. या शेअरमध्ये तेजीचे सत्र कायम होते. दुपारपर्यंत या शेअरने कमाल केली. हा शेअर 403 रुपयांवर व्यापार करत होता. या शेअरने पहिल्याच दिवशी 427 रुपयांचा उच्चांक गाठला.

एलईडी उत्पादनांची कंपनी ही कंपनी एलईडी उत्पादने तयार करुन विक्री करते. त्यानंतर कंपनीचे ग्राहक त्यांच्या नावाने ही उत्पादने बाजारात विक्री करतात. या कंपनीचे 4 प्लँट आहेत. उत्तराखंड येथील सिडकूल हरिद्वार औद्योगिक पार्कमध्ये तर 3 उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहेत. आईकियो लाईटिंग आयपीओतील पैशांतून 50 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार आहे. याशिवाय ही कंपनी जवळपास 212 कोटी रुपये आईकियो सोल्यूशन्ससाठी वापरण्यात येईल. त्यातून एक नवीन प्रकल्प टाकण्यात येणार आहे. या कंपनीच्या आयपीओवर गुंतवणूकदारांनी उड्या टाकल्या. गुंतवणूकदारांना पण त्याचा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

आईकियो लाईटिंगच्या शेवटच्या दिवशी एकूण 66.29 पट सब्सक्रिप्शन मिळाले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकड्यानुसार, कंपनी 606.5 कोटी रुपयांच्या आयपीओ माध्यमातून 1,52,24,074 शेअर बाजारात उतरविण्याची तयारी होती. त्याबदल्यात 100,92,76,892 शेअर्सची बोली लावण्यात आली. पात्र संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. या श्रेणीत या आयपीओला 163.58 पट सब्सक्रिप्शन मिळाले. तर इतर गुंतवणूकदारांनी 63.3 पटीने खरेदी केली. किरकोळ गुंतवणूकदारांनी 13.86 पटीत खरेदी केली.

कंपनी होईल कर्जमुक्त टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचे (Tata Motors Share) तिमाही निकाल लवकरच हाती येणार आहे. यावेळी कंपनी जोरदार कामगिरी करु शकते, असा अंदाज बांधण्यात येत आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत टाटा मोटर्स कर्जमुक्त होईल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने व्यक्त केला आहे. या ब्रोकरेज फर्मने हे शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक खरेदी करणे फायद्याचे गणित ठरु शकते. टाटा कंपनीवर गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास आहे. हा शेअर काही दिवसातच लांबचा पल्ला गाठेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फायदा होईल.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. गुंतवणूक तज्ज्ञ, विश्लेषकाची मदत आवश्य घ्यावी. त्याशिवाय गुंतवणूक करणे जोखमीचे ठरेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.