ऑक्टोबरमध्ये ‘या’ राज्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार, डीए आणि टीएमध्ये इतकी वाढ
केंद्राप्रमाणे आता राज्यांना 25% पेक्षा जास्त डीए मिळत आहे. या आधारावर, घरभाडे भत्ता (एचआरए) देखील वाढला आहे. नवीन बदलानुसार, कर्मचाऱ्यांना 9, 18 आणि 27 टक्के दराने एचआरए मिळेल, तर पूर्वी 8, 16 आणि 24 टक्के एचआरए देण्यात आला होता. ज्यांचे मूळ वेतन पूर्वी 24200 रुपये होते, त्यांना आता 28 टक्के दराने 6776 रुपये डीए मिळेल.
नवी दिल्लीः ओडिशा सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना सणानिमित्त एक मोठी बातमी दिलीय. कार्यरत कर्मचाऱ्यांबरोबरच पेन्शनधारकांनाही वाढीव पगाराचा लाभ मिळणार आहे. ओडिशा सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये 11 टक्के वाढ जाहीर केलीय. हा निर्णय या वर्षी 1 जुलैपासून लागू झाला. म्हणजेच पूर्ण थकबाकी जोडून कर्मचाऱ्यांना पैसे मिळतील. देशाच्या इतर राज्यांमध्ये जसे बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि इतर अनेक प्रांतांमध्ये असेच काही फायदे दिसू शकतात. केंद्र सरकारने डीए आणि डिअरनेस रिलीफ (DR) मध्ये वाढ केल्यानंतर राज्य सरकारांनीही त्याचे फायदे आपल्या कर्मचाऱ्यांना देणे सुरू केले. डीएमध्ये वाढ झाल्याने या राज्यांच्या कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता (TA) देखील वाढलेत.
आधी काय मिळायचे, आता काय मिळेल?
केंद्राप्रमाणे आता राज्यांना 25% पेक्षा जास्त डीए मिळत आहे. या आधारावर, घरभाडे भत्ता (एचआरए) देखील वाढला आहे. नवीन बदलानुसार, कर्मचाऱ्यांना 9, 18 आणि 27 टक्के दराने एचआरए मिळेल, तर पूर्वी 8, 16 आणि 24 टक्के एचआरए देण्यात आला होता. ज्यांचे मूळ वेतन पूर्वी 24200 रुपये होते, त्यांना आता 28 टक्के दराने 6776 रुपये डीए मिळेल. पूर्वी या पगाराच्या स्लॅबमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 17% महागाई भत्ता म्हणून 4114 रुपये मिळत असत. आता या 17 टक्के डीएमध्ये 11 टक्के अधिक डीएची वाढ झाली आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या हातात अतिरिक्त 2662 रुपये येतील. या आधारावर, पूर्वीच्या 4114 रुपयांऐवजी कर्मचाऱ्यांना 6776 रुपये मिळतील. हा लाभ ऑक्टोबर महिन्यापासून मिळण्यास सुरुवात होईल.
तुम्हाला महागाई भत्ता किती मिळेल?
जर हा पगार स्लॅब असलेला कर्मचारी मेट्रो शहरात राहतो, तर त्याला दरमहा 4608 रुपये ट्रान्सपोर्ट भत्ता (TA) या शीर्षकाखाली मिळतील. अशा प्रकारे, बेसिकमध्ये 24200 रुपये, 28% डीएच्या नावावर 6778 रुपये आणि टीएच्या डोक्यात 4608 रुपये जोडल्यास ऑक्टोबर महिन्यात 35,584 रुपये कर्मचाऱ्यांच्या हातात येतील. मात्र, त्यात एचआरए आणि इतर भत्त्यांचा समावेश नाही. नवीन नियमानुसार, स्तर 1 ते 2 च्या कर्मचाऱ्यांना 1152 रुपयांपासून 4608 रुपयांपर्यंत टीए मिळेल. स्तर 3 ते 8 च्या कर्मचाऱ्यांना 2304 ते 4608 रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळेल. या वरील म्हणजे 9 व्या स्तरातील कर्मचाऱ्यांना TA म्हणून 4608 ते 9216 रुपये भत्ता मिळेल.
ओडिशाच्या कर्मचाऱ्यांना फायदा
अशी अधिकृत घोषणा ओडिशा सरकारने केली आहे. येथील कर्मचारी 28%पर्यंत DA चा लाभ घेतील. या निर्णयामुळे ओडिशाचे 4 लाख नियमित कर्मचारी आणि 3.5 निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल. वाढीव पगाराचा लाभ ऑक्टोबर महिन्यापासून मिळेल. कर्मचाऱ्यांना रोख तीन महिन्यांच्या डीए वाढीचा लाभही दिला जाईल. महागाईतून दिलासा देण्यासाठी दिलेल्या कर्मचाऱ्याच्या मूळ पगारावर डीए अवलंबून आहे. ओडिशामध्ये, जर नोकरी आणि सेवेदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर सरकारला गट विम्याचा अधिक लाभ मिळेल. त्याच्या नियमांमध्ये आधीच बदल केले गेले आहेत.
संबंधित बातम्या
मुकेश अंबानींनी सौर ऊर्जेमध्ये क्रांती आणण्यासाठी ही कंपनी केली खरेदी, हजारो कोटी रुपयांचा करार
तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर 4 लाखांचा क्लेम सहज मिळवाल, थकबाकीही मिळणार
In October, the salaries of employees of ‘these’ states will go up, DA and TA will go up