Tax Free Countries | कराचा नाही मोठा बोजा, या 8 देशातील नागरिक एकदम सुखी
Tax Free Countries | प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था कर रचनेवर टिकलेली आहे. करदात्यांच्या जीवावर अनेक देशांचा डोलारा चालतो. कर हा देशाच्या विकासासाठी महत्वाचे इंधन असल्याचे मानल्या जाते. पण जगाच्या पाठीवर असे ही देश आहेत, जिथे नागरिकांना कर भरावा लागत नाही. नागरिकांवर कराचा बोजा नाही. कोणते आहेत हे करमुक्त देश?

नवी दिल्ली | 19 ऑक्टोबर 2023 : प्रत्येक देशातील नागरिक हा करांनी घेरलेला आहे. त्याच्या आयुष्यात तो कळत-नकळत कर भरत असतो. त्याला काही करांची तर माहिती पण नसते. पण सरकार मोठ्या खुबीने त्याच्या खिशातून रक्कम काढते. आयकर, टोल, रोड, इंधन, वस्तू खरेदी केल्यावर, वाहन खरेदी केल्यावर अजून काय काय कराचा बोजा त्याच्या खिशावर पडतो. पण जगातील काही देशात बिलकूल कर द्यावा लागत नाही. हो या देशातील सरकार, कराच्या रुपाने नागरिकांचे शोषण करत नाही. मग या देशांची कमाई होते तरी कशी, या सरकारचे उत्पन्नाचे साधन तरी काय, कोणते आहेत हे देश?
- बर्म्युडा – जागतिक बँकेच्या अहवालानुसार, 2021 पर्यंत बर्म्युडा या देशाची लोकसंख्या केवळ 63,000 इतकी होती. उत्तर अटलांटिक महासागरातील या देशात नागरिकांना त्यांच्या कमाईवर कोणताही कर चुकता करावा लागत नाही. कंपनी, कर्मचाऱ्यांच्या पगारावर 14 टक्के पे-रोल टॅक्स सरकारकडे जमा करतो.
- सौदी अरब- सौदी अरबमध्ये नोकरदारांना पगारावर कोणताही कर द्यावा लागत नाही. पण स्वतःचा व्यवसाय करत असाल, व्यापार असेल तर तुम्हाला 20 टक्क्यांचा कर द्यावा लागतो. हा नियम प्रवाशांसाठी पण लागू आहे. ब्रुनेई मध्ये कोणाला ही व्यक्तिगत आयकर द्यावा लागत नाही.
- ओमान – ओमान हा एक तेल उत्पादक देश आहे. या मुस्लीम बहुसंख्य देशात नागरिकांना कोणताही कर द्यावा लागत नाही. ओमान कोणत्याही नागरिकांवर कर लावत नाही. हा देश नागरिकांसाठी स्वर्गाशिवाय कमी नाही.
- कुवेत – ओमानच्या मध्य-पूर्वेला कुवेत हा देश आहे. हा देश पण करमुक्त आहे. येथील कायद्यानुसार, प्रत्येक नागरिक करमुक्त आहे. त्याच्यावर कराचे ओझे नाही. पण सामाजिक सुरक्षेसाठी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना योगदान द्यावे लागते. नागरिकांना पण त्यात सहभाग नोंदवावा लागतो.
- कॅमेन आयलँड – या उत्तर अमेरिकन कॅरेबियन बेटावर नागरिकांना कोणताही कर द्यावा लागत नाही. सामाजिक सुरक्षेसाठी पण फंड द्यावा लागत नाही. हे एक ब्रिटिश क्षेत्र आहे. नॅशनल पेन्शन लॉनुसार कंपनीला कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती योजना राबवावी लागते.
- बहरीन- या देशात नोकरदारांना आयकर द्यावा लागत नाही. पण सामाजिक सुरक्षा आणि रोजगार कर द्यावा लागतो. एकूण उत्पन्नाच्या 7 टक्के रक्कम सामाजिक सुरक्षेत जमा करावी लागते. तर कंपन्या या फंडात 12 टक्के रक्कम जमा करतात.