चालू आर्थिक वर्षात 2.26 कोटी करदात्यांना मिळाला Tax Refund, घरी बसल्या ‘असे’ चेक करा आपल्या आयकर परताव्याचे स्टेटस

आयकर विभागाकडून (Income Tax Department) चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 20 मार्चपर्यंत 2.26 कोटी करदात्यांना (Taxpayers) 1.93 कोटी रुपयांचा कर परतावा (Tax Refund) देण्यात आला आहे.

चालू आर्थिक वर्षात 2.26 कोटी करदात्यांना मिळाला Tax Refund, घरी बसल्या 'असे' चेक करा आपल्या आयकर परताव्याचे स्टेटस
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 6:44 AM

आयकर विभागाकडून (Income Tax Department) चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 20 मार्चपर्यंत 2.26 कोटी करदात्यांना (Taxpayers) 1.93 कोटी रुपयांचा कर परतावा (Tax Refund) देण्यात आला आहे. इनकम टॅक्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार यापैकी 38,447.27 कोटी रुपयांचे 1.85 कोटी रिफंड हे मूल्यांकन वर्ष 2021-22 संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आहेत. याबाबत गुरुवारी आयकर विभागाकडून एक ट्विट देखील करण्यात आले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड ‘सीबीडीटी’ ने एक एप्रिल 2021 ते 20 मार्च 2022 या कालावधीत 2.26 कोटी करदात्यांना 1,93,720 कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. यामध्ये 70,977 कोटी रुपयांच्या व्यक्तीगत कर परतावा तर 1,22,744 कोटी रुपये कॉरपोरेट कर परताव्याचा समावेश आहे. जर तुम्हाला तुमचा इनकम टॅक्स परतावा आला आहे की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्ही घरबसल्या देखील चेक करू शकता. त्यासाठी अत्यंत सोपी अशी पद्धत आहे. आज आपण आयकर परतावा जमा झाला आहे की नाही? हे कसे चेक करायचे याबाबत जाणून घेऊयात.

‘असे’ चेक करा आपल्या आयकर परताव्याचे स्टेटस

इनकम टॅक्स विभागाची वेबसाइट www.incometax.gov.in वर जा. तिथे तुमचा यूजर आयडी आयडी आणि पासवर्ड टाकून खाते लॉगइन करा. त्यानंतर ई-फाइन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथे इनकम टॅक्स रिटर्न्सचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर व्ह्यू फाइल्ड रिरिटर्न्सचा ऑपशन निवडा. तिथे तुम्ही तुमचे आयटीआर स्टेटस चेक करू शकता. तिथे तुम्हाला तुम्ही किती टॅक्स भरला आहे? तुम्हाला आयकर परतावा कधी मिळणार आहे, किती मिळणार आहे अशा सर्व गोष्टींची माहिती मिळते.

‘एनएसडीएल’च्या वेबसाईटला भेट द्या

तुम्ही एनएसडीएलच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुमच्या आयकर परताव्याचे स्टेटस चेक करू शकता. त्यासाठी सर्वात प्रथम https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर तुम्ही तिथे तुमच्या पॅन कार्डची डिटेल सबमिट करा. माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची आयकर परताव्याबाबतची सर्वा माहिती मिळेल.

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीला मिळाले नवीन सीईओ; हिसाशी ताकेऊची एप्रिलपासून पदभार स्विकारणार, तीन वर्षासाठी नियुक्ती

Sri Lanka Debt Crisis: खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी हाणामारी! 1 लीटर दुधाची किंमत तब्बल 2 हजार, सोन्याच्या लंकेवर एवढी वाईट परिस्थिती का?

Discount मिळालेल्या Russian Crude Oil दरापेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ? Indian Oilने नेमकं काय केलं?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.