Income Tax Refund : अजून नाही मिळाला रिफंड? मग आता होणार फायदा डबल

Income Tax Refund Delay : आयकर रिटर्न दाखल केला आहे. पण अजूनही रिफंड मिळाला नाही का? तर चिंता करु नका. तुम्हाला आयकर विभागाकडून दोन खूशखबर मिळतील. एक तर रिफंड संबंधी असेल तर दुसरी पण एक आनंदवार्ता येऊन धडकेल. काय आहे ही खूशखबर?

Income Tax Refund : अजून नाही मिळाला रिफंड? मग आता होणार फायदा डबल
आयकर रिफंडबाबत काय अपडेट
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 10:11 AM

प्रत्येक वर्षी कोट्यवधी भारतीय आयकर रिटर्न फाईल करतात. त्यांना लवकरात लवकर रिफंड मिळण्याची आशा असते. अजूनही अनेकांना रिफंड मिळण्याची प्रतिक्षा आहे. रिफंड मिळाला नसेल तर चिंता करु नका. आता करदात्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. सरकार रिफंड लवकर न दिल्यास त्यावर व्याज देते. हे व्याज दरमहा 0.5% म्हणजे वर्षाला 6% दराने देण्यात येते. हे व्याज 1 एप्रिलपासून ते रिफंड मिळण्याच्या तारखेपर्यंत निश्चित असते. करदात्यांना किती व्याज मिळते आणि इनकम टॅक्स रिफंडला उशीर होण्यामागे कारण तरी काय? ते जाणून घ्या.

किती मिळेल व्याज?

सरकार तुम्हाला दर महा 0.5% म्हणजे वर्षाला 6% दराने व्याज देईल. हे व्याज 1 एप्रिलपासून रिफंड मिळण्याच्या तारखेपर्यंत मिळेल. पण तुम्हाला मिळणारा रिफंड हा एकूण कराच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला व्याज मिळणार नाही. याविषयीची अधिक माहिती तुमचा आर्थिक सल्लागार, सीए याच्याकडून मिळू शकते. काही तांत्रिक कारणं आणि मानवी चुकांमुळे रिफंड मिळण्यात उशीर होत असल्याचे समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

का होतो रिफंडमध्ये उशीर?

1.E-Verify न केल्यामुळे

2.आयकर विभागाच्या ईमेलला वेळेत उत्तर न देणे

3.टीडीएस न मिळणे

4.चुकीचा बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड दिल्याने

5.पॅनकार्ड आणि बँक खात्यावरील नाव वेगवेगळे असतील तर

6.पॅनकार्ड आधार कार्डसोबत लिंक नसेल तर

रिफंड स्टेट्‍स कसे कराल चेक?

तुम्ही घर बसल्या काही मिनिटात तुमच्या रिफंडचे स्टेटस तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html या पेजला भेट द्यावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आणि वर्षाची माहिती द्यावी लागेल. यामध्ये कॅप्चा कोड टाकून सबमिट बटण दाबावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रिफंड स्टेट्‍सचा तपशील मिळेल.

रिफंडमध्ये उशीर झाला तर काय कराल?

ईमेल तपासा : आयकर विभागाने पाठवलेला ईमल तपासा

आयकर विभागाची साईट : आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन फाईलचे स्टेटस तपासा.

तक्रार नोंदवा : आयकर विभागाच्या साईटवरील टोल फ्री क्रमांक 1800-103-4455 वर तक्रार नोंदवा.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.