Income Tax Saving | असा वाचवा की इनकम टॅक्स, आयकर वाचविण्याच्या या आहेत टिप्स
Income Tax Saving | आर्थिक वर्ष 2023-24 लवकरच संपणार आहे. जर तुम्ही आतापर्यंत कर बचतीसाठी कोणतेही आर्थिक नियोजन केले नसेल तर हे महत्वाचे काम पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फार अधिक कालावधी उरलेला नाही. त्यामुळे लागलीच कर बचतीसाठी कोणती योजना योग्य राहिल ते शोधा आणि गुंतवणूक करा.
नवी दिल्ली | 16 February 2024 : हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी फार मोठा कालावधी उरलेला नाही. अनेक करदाते आतापासूनच आर्थिक नियोजन करण्यात गुंतले आहेत. जर तुम्ही आतापर्यंत कर बचतीसाठी काही प्लॅन आखाला नसेल तर तुमच्यासाठी अधिक वेळ उरलेला नाही. तुमच्या उत्पन्नावर कमीत कमी कर आकारला जावा यासाठी नियोजन महत्वाचे आहे. कर बचतीसाठी तुम्हाला या टिप्स महत्वाच्या ठरतील. तुम्ही गुंतवणुकीपूर्वी कर सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्यावा.
- PPF – पब्लिक प्रोव्हिडेंट फंड हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. ही देशातील सर्वात लोकप्रिय कर बचत योजना आहे. पीपीएफवर सध्या 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणुकीवर कर बचतीसह तगडा रिर्टनही मिळतो. या योजनेला सरकारची हमी आहे. या योजनेत 15 वर्षांकरीता पैसा लॉकइन राहतो.
- NPS – नॅशनल पेन्शन सिस्टम ही एक सरकारी निवृत्ती योजना आहे. या योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. तर कलम 80CCD (1B) अंतर्गत 50 हजारांची अतिरिक्त गुंतवणूक करता येते. एकूण दोन लाख रुपयांपर्यंतची कर सूट मिळते. या योजनेत 1000 रुपये महिन्यापासून गुंतवणूक करता येते. 18 ते 65 वर्ष वयोगटातील भारतीय नागरिक गुंतवणूक करु शकतो.
- सुकन्या समृद्धी योजना – मुलींसाठी खास असलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) परताव्यासह गुंतवणुकीसाठी चांगली आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वयातील मुलींच्या नावे या योजनेत गुंतवणूक करता येते. योजनेत वार्षिक दीड लाख रुपयांवर कर सवलत मिळवता येते. सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजात बदल झाला आहे. आता या योजनेत 8.2 टक्के व्याज मिळते.
- SCSS – ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना लोकप्रिय आहे. या योजनेत बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणूकदारांना लाभ मिळतो. 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक कर सवलतीस पात्र असते. या योजनेवर सध्या 8.2 टक्के दराने व्याज मिळते.
- म्युच्युअल फंड – या श्रेणीत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणुकीवर कर बचतीसह तगडा रिर्टनही मिळतो. या योजनांचा लॉक इन पिरीयड इतर योजनांपेक्षा अत्यंत कमी आहे. इतर अल्पबचत योजनांमध्ये चांगला परतावा मिळण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो आणि त्यावरील व्याजही कमी मिळते.
हे सुद्धा वाचा