India-Canda : कॅनडाचा वाद थेट किचनला भिडणार, बजेट असे वाढणार

India-Canda : शेजारी नसलेल्या कॅनडाशी भारताचे संबंध आता टोकाचे ताणल्या गेले आहेत. या वादाचा परिणाम थेट भारतीयांच्या किचन बजेटवर पडणार आहे. कॅनडाचे जसे नुकसान होईल, तसे भारताचे पण नुकसान होईल, असा बसू शकतो फटका..

India-Canda : कॅनडाचा वाद थेट किचनला भिडणार, बजेट असे वाढणार
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 3:21 PM

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : भारत कॅनडामधील वाद (India Canda Crisis) शमण्याची चिन्हे दिसत नाही. कॅनडाच्या पंतप्रधानांनी नरमाईचे सूर आळवले असले तरी वाद संपलेला नाही. खलिस्तानवाद्यांसाठी आश्रू गाळणाऱ्या पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (PM Justin Trudeau) यांच्याविरोधात भारतात संतापाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी राजदूत परत पाठवले आहेत. नवीन व्यापारी धोरणे थंडबस्त्यात पडली आहे. दोन्ही देशांमधील वादाने टोक गाठले आहे. भारत आणि कॅनडामध्ये यावर्षी 2023 मध्ये जवळपास 8 अब्ज डॉलर म्हणजे 67 हजार कोटींचा व्यापार झाला आहे. जर परिस्थिती आणखी चिघळली तर 67 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागू शकते. त्याचा परिणाम थेट किचन बजेटवर होणार आहे.

असा दिसेल परिणाम

सर्वसामान्य भारतीयांच्या आहारात डाळींना खूप महत्व आहे. भारत-कॅनडामध्ये तणाव वाढल्याने डाळीच्या आयातीवर त्याचा परिणाम होईल. भारत कॅनडातून मसूर डाळ सर्वाधिक आयात करतो. राजकीय संबंध ताणल्याचे परिणाम व्यापारी संबंधावर दिसून येतील. डाळीच आयात रोडावू शकते. देशात सर्वसामान्य महागाईने मेटाकूटीला आला असताना हे नवीन संकट त्याला फटका देईल.

हे सुद्धा वाचा

असे बिघडेल किचन बजेट

भारत कॅनाडातून मोठ्या प्रमाणात मसूर डाळ आयात करतो. 2022-23 या कालावधीत देशात एकूण 8.58 लाख टन मसूर डाळीची आयात करण्यात आली होती. या जून तिमाहीत आतापर्यत जवळपास 3 लाख टन मसूर डाळीची आयात करण्यात आली आहे. जर वाद लवकर मिटला नाही तर आयात थांबेल, मसूर डाळ पण महागेल. पचणास हलकी म्हणून या डाळीचा मोठा वापर होतो.

मसूर डाळीचे वाढू शकतात भाव

भारत-कॅनडा वाद लांबला तर डाळीच्या आयातीवर निर्बंध येऊ शकतात. डाळीचा पुरवठा रोडावू शकतो. मसूर डाळीची आवक सर्वाधिक प्रभावित होईल. देशात पुरवठा कमी झाल्यास अथवा काळाबाजार झाल्यास डाळीच्या किंमती भडकू शकतात. केंद्र सरकारने डाळीच्या महागाईवर तोडगा काढला आहे. डाळीची आयात वाढविण्यासाठी अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्या आहेत. पण या नवीन वादाने डोके वर काढल्याने मसूरसह इतर डाळीच्या आयतीवर परिणाम दिसू शकतो.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.