Sensex : शेअर बाजार होणार 1 लाखांचा मनसबदार? अर्थव्यवस्था सूसाट असताना काय आहे तज्ज्ञांचा अंदाज..
Sensex : भारताची अर्थव्यवस्थेत जागतिक पातळीवर झेप घेत असताना शेअर बाजारही मागे कसा असेल?
नवी दिल्ली : कोरोना महामारीचा (Covid-19) कहर असो वा महागाईचा (Inflation) मार, भारत जगातील सर्वात वेगाने अग्रेसर असलेल्या राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian Economy) मोठी झेप घेतली आहे. अर्थव्यवस्थेने जर झेप घेतली असेल तर भारतीय शेअर निर्देशांक (Sensex) ही कसा मागे राहिल?तज्ज्ञांनी काय केला आहे दावा..
भारतीय शेअर बाजार 5 ट्रिलियन म्हणजे भारतीय चलनात 5,00,000 कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय शेअर निर्देशांक (Sensex) ही जोरदार उडी मारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दाव्यानुसार, भारतीय शेअर बाजार एक लाखांच्या घरात असेल.
दलाल स्ट्रीटचे (Dalal Street) फंड मॅनेजर आणि विश्लेषक भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीविषयी ऊत्साहित आहेत. दाव्यानुसार, भारतीय अर्थव्यवस्था 2028 पर्यंत 5 ट्रिलियनपर्यंत झेप घेईल. तर येत्या तीन ते चार वर्षांत शेअर बाजार 1,00,000 अंकाचा असेल.
सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) 62,000 अंकावर खेळत आहे. हा त्याचा सर्वोत्तम कालावधी मानण्यात येतो. बीएसईमध्ये 30 शेअर सूचीबद्ध आहेत. त्यामुळे येत्या चार वर्षांत एक लाख अंकाचा टप्पा गाठणे शक्य असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आजतकने दिलेल्या बातमीनुसार, Yes Securities चे अमर अंबानी यांनी येत्या 3.5 वर्षांत सेन्सेक्स एक लाखांचा टप्पा सहज गाठेल, असा दावा केला आहे. तर महागाई आणि व्याज दरातील वाढीचा ही फायदा या दाव्याला पुष्टी देत आहे.
तर काही विश्लेषकांनी भारतीय बाजार वधारेल. पण एक लाखांच्या अंकावर तो फार काळ तग धरेल, याबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या मते, एक लाखांचा विक्रम करुन सेन्सेक्स त्यापेक्षा कमी अंकावर खेळेल.