AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Group : iPhone वर टाटाची मोहर! चीनला चीतपट करण्याची पूर्ण तयारी

Tata Group : आयफोनवर आता टाटाची मोहर उमटणार आहे. चीनला चीतपट करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत अनेक घडामोडी घडणार आहेत. काय आहेत अपडेट

Tata Group : iPhone वर टाटाची मोहर! चीनला चीतपट करण्याची पूर्ण तयारी
| Updated on: Jul 11, 2023 | 4:14 PM
Share

नवी दिल्ली : देशातील मोठे औद्योगिक कुटुंब, टाटा समूह (Tata Group) चीनला धोबीपछाड देणार आहे. लवकरच कंपनी आयफोन (iPhone) निर्मितीत आघाडी घेणार आहे. ॲप्पल पुरवठा करणारी कंपनी विस्ट्रॉन कॉर्प सोबत (Wistron Corp.) चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. लवकरच या दोन कंपन्यांमध्ये करार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी चर्चेचे अनेक राऊंड झाले आहेत. त्यात दोन्ही कंपन्या आगेकूच करत आहेत. आयफोनवर आता टाटाची मोहर उमटणार आहे. चीनला चीतपट करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत अनेक घडामोडी घडणार आहेत. काय आहेत अपडेट

टाटा ठरणार पहिली कंपनी हा करार ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता आहे. आयफोन असेंम्बल करणारा टाटा हा भारताचा पहिला समूह ठरेल. विस्ट्रॉनचा प्रकल्प हा कर्नाटक राज्यात आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, या प्रकल्पाचे मूल्य 60 कोटी डॉलरपेक्षा अधिक असेल. या प्लँटमध्ये आयफोन 14 मॉडलचे असेंम्बलिंग करण्यात येईल. यामध्ये 10,000 पेक्षा अधिक जणांना रोजगार मिळेल.

तैवान कंपनीची मोठी गुंतवणूक विस्ट्रॉन ही पण तैवान कंपनी आहे. फॉक्सकॉन ही तैवान कंपनी भारतात सेमीकंडक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उतरण्याची कवायत करत असताना विस्ट्रॉन पण भारतीय बाजारात गुंतवणुकीसाठी कदमताल करत आहे. या आर्थिक वर्षात कर्नाटकमधील प्रकल्पात कमीत कमी 1.8 अब्ज डॉलर आयफोन तयार करण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे या कंपनीला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन भत्ता मिळेल.

मोठ्या प्रमाणात रोजगार पुढील वर्षांपर्यंत तिप्पट मनुष्यबळ उभं करण्याची तयारी करण्यात आली आहे. विस्ट्रॉन कंपनी भारतातील आयफोन व्यवसायातून बाहेर पडू इच्छित आहे. त्यामुळे विस्ट्रॉन येथील प्लँट टाटाला विक्री करण्याच्या तयारीत आहे. या कराराविषयी टाटा, विस्ट्रॉन आणि ॲप्पलने कोणताही खुलासा केला नाही. विस्ट्रॉनने भारतीय बाजारातून ॲप्पलच्या व्यवसायातून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. कंपनीचे लक्ष इतर व्यवसायावर केंद्रीत झाले आहे. कंपनी भारतातच ॲप्पलच्या दुसऱ्या व्यवसायात रुची घेत आहे.

चीनला आव्हान कोरोना महामारीमुळे चीनमध्ये उत्पादनात मोठे अडथळे आले. कोरोनाचे उगमस्थानच चीन असल्याने जागतिक समुदायाची नाराजी चीनने ओढावून घेतली. त्यातच अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणल्या गेले. त्याचा मोठा फटका बसला. अनेक कंपन्या चीनमधून काढता पाय घेत आहेत.

भारतात पोषक वातावरण भारतात जागतिक दर्जाच्या कंपन्या आणण्यासाठी पायघड्या अंथरण्यात येत आहे. रोजगार वाढीसाठी आणि जागतिक ब्रँड भारतात येण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. भारत गुंतवणुकीसाठी अनेक कंपन्यांच्या पसंतीस उतरला आहे. टाटा समूहाने नुकतीच इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात दमदार एंट्री घेतली आहे. तामिळनाडूच्या फॅक्टरीत सध्या आयफोनसाठी मेटल बॅकबोन निर्मिती होत आहे. कंपनी आता चिप तयार करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.