Gold : सोन्यात केली गुंतवणूक? आता कमाईवर द्यावा लागेल हा कर..

Gold : सोन्याच्या कमाईवर आता गुंतवणूकदारांना कर भरावा लागणार आहे..

Gold : सोन्यात केली गुंतवणूक? आता कमाईवर द्यावा लागेल हा कर..
सोन्यावर लागणार करImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 4:38 PM

नवी दिल्ली : सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) ही सुरक्षित मानतात. पारंपारिक गुंतवणूक म्हणून सोन्यातील गुंतवणुकीकडे पाहण्यात येते. महिला तर सोन्यातील गुंतवणूक ही उतारवयातील कमाईची काठी मानतात. कारण पै पै जोडून खरेदी केलेले सोने हे चांगला परतावा देते. परंतु, सरकार लवकरच सोन्याचे उत्पन्न हे कर पात्र (Tax on Gold) करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळणार आहे. सोन्याचा मोह सोडविण्यासाठी आणि सोन्याची आयात (Gold Import) कमी करण्यासाठी तर केंद्र सरकार (Central Government) हे पाऊल टाकत नाही ना? असा सवाल विचारण्यात येत आहे.

ET Now ने सूत्रांच्या आधारे दिलेल्या बातमीनुसार, आगामी अर्थसंकल्पात काही संपत्तीच्या श्रेणीबाबत कर नियमांमध्ये बदल (Reclassification of Assets) करण्यात येऊ शकतो. यामध्ये सोन्याचा ही समावेश आहे. सोन्याला आता भांडवली लाभ कर (Capital Gain Tax) मोजावा लागणार आहे.

याविषयी IIFL चे अनुज गुप्ता यांच्या मते, भारतात सध्या सोन्याची खरेदी रोखीत करण्यात येते. त्यामुळे सोन्यातून होणारी कमाई भारतीय निव्वळ नफा म्हणूनच बघतात. नवीन व्यवस्थेत सोने हे भांडवली लाभ करात मोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ट्रॅक करणे सोपे होईल.

हे सुद्धा वाचा

एका निश्चित कालावधीत कोणत्याही उत्पन्नावरील कमाईवर कॅपिटल गेन टॅक्स लागू करण्यात येतो. या कराच्या परीघात शेअर बाजार अथवा जमीन-जुमल्यावरील उत्पन्नाचा समावेश करण्यात येतो.

24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळत नाही. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं.

इतर 8.33 टक्क्यांमध्ये इतर धातू असतात. त्याचबरोबर 21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोनं असतं. 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोनं असतं.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.